Friday, May 17, 2013

Matrimonial Website नावाचा जुगार


१. स्थळ संशोधन आई-बाबा करत आहेत : Quoting Sushmita Sen: Each person has a public side and a private side. आपला मुलगा कसा आहे हे खरंच घरच्यांना १०० % कळलेलं असतं ? भारतात गरीब गाय / श्रावण बाळाचा अवतार असलेल्या पोरांनी US ला येउन काय काय दिवे लावलेत ते मी प्रत्यक्ष पाहिलंय. इथे लावलेल्या सगळ्या दिव्यांचा उजाळा भारतापर्यंत तर नक्कीच पोचला नसतो ना?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलाबरोबर कोण compatible असणार आहे याचा निर्णय मुलगा सोडून दुसरा कोणी घेऊच कसं शकतं ? उदाहरणच द्यायचं झालं तर माझा एक श्रावणबाळ मित्र म्हणजे "शुक्रवारी फोन केला तर उचलला जाणारच नाही कारण म्हणे महाशय दारू पिउन पडलेले असतात". महाशयांची girlfriend कडून एकच अपेक्षा आहे - ती पण 'cheers' करणारी पाहिजे. आता ह्या तळीरामाला त्याच्या एवढीच, पाहिजे तरी त्याच्यापेक्षा पेताड  girlfriend मिळालीये आणि त्यांचं लग्नदेखील ठरलंय ती गोष्ट अलाहिदा. पण समजा जर महाशय काल लग्नाच्या बाजारात उभे असते तर त्याच्या आईबाबांच्या आदर्श सुनेच्या व्याख्येत त्याला हवी तशी जोडीदारीण बसणारच नव्हती, मग अश्यावेळी आईबाबांनी "initial filtering" करण्यात तरी काय  तथ्य आहे?

कारण क्रमांक २ : मुलगा त्याच्या कामात गर्क असल्याकारणाने आईबाबा मुलगी बघत आहेत : ज्या मुलाला स्वतःच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्ठ्या निर्णयासाठी वेळ नाहीये तो मुलगा पुढे बायकोला काय वेळ देणार आहे?

मुद्दा क्रमांक ३: मागे  एका UF मित्राशी बोलत होते. त्याचं म्हणणं आहे की आत्ता जे US मध्ये आहेत त्यांच्यासाठी अजून लग्न ही priority च नाही आहे. मग मुलगा आत्ता लग्नाच्या बाबतीत serious च नसेल तर आई बाबांनी कितीही गळ घालून काय फरक पडणार आहे?

२ . पत्रिका: ज्याचा विश्वास आहे त्याने जरूर बघावी, पण ज्याच्याकडून बघून घेणार तो कितपत माहितगार आहे ते कसं कळणार ? आता तिचं लग्न झालं, पण शोधात होती तेव्हा एका मैत्रिणीने  खूप मार्मिक मुद्दा काढला कि बघायची असेल तर बोला-भेटायच्या आधी पत्रिका बघावी. भेटल्यावर उगाचच नकार द्यायला गुळमुळीत excuse म्हणून / नकार देताना मुलगी दुखावली तरी आपल्या ego साठी ढाल म्हणून पत्रिकेचा विषय काढू नये. तिच्या case मध्ये तिचे बाबा मुलाच्या बाबांशी फोनवर बोलत असतानाच मुलाच्या बाबांनी जन्मतारीख मागून, computer वर खुड-खुड करून पत्रिका जुळत नाही पाहून फोनच ठेऊन दिला! 

पण अजूनही लोकं पत्रिका बघताहेत हे  at least मला तरी खूप हास्यास्पद वाटलं. एखाद्या situation मध्ये एखादी व्यक्ती  कशी असणार आहे हे फक्तं  ती व्यक्ती किती समंजस Vs  आतताई आहे, यावरच अवलंबून आहे नाही का? पंचवीस वर्षांपूर्वी एखाद्याच्या स्वभावाचा अंदाज कोणी कसा लावला असणार आहे ? लग्नानंतर भारतात असणार आहे की US मध्ये वगैरे गोष्टी ती  + other half + available career opportunities + कंपनी ठरवणार आहे की ते पण पत्रिकेत लिहिलं असणार आहे?

३. Photo Request: Quoting my Dallas roommate: "अरे कोणी कसं दिसतंय त्यावरून भाळायला / infatuation ला आता काही आपण teenagers नाही आहोत". एका मित्राने तो अगदी खास मुलगी बघण्यासाठी भारतात गेला असताना मुलीचे दात पुढे आहेत म्हणून नकार दिला. आता तो मित्र म्हणून मी त्याला काही बोलले नाही पण मला हे नक्कीच खटकलं. आणि हो, मित्राने नकार देताना कारण 'पत्रिका जुळत नाही' असंच सांगितलं.
 चष्मा: आजकाल कुणाला नसतो?

माझ्या २ जिगरी सख्यांना त्यांचा जान-ए-जिगर online गावलाय. शेवटी blind shot आहे, especially when the "target" is unknown :P


6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. patrika he fakt mulila nakar dyayala asanarya kubadya ahet tyavar mulachya aai babancha vishwas asatoch ase nasate ani sagalyanach mulagi hi akhud shingi bahududhi asavi ashi apexa ahe....
    mule baher not necessory paradeshat aplya deshat hi gharabaher jaun kai dive lavatat ani tithe tyanchi "dhamal" chi def kai ahe ychi gharachyanna kadimatra kalpana nasate...

    ReplyDelete
  3. very nice.....It's a change that required!

    ReplyDelete
  4. Deepe kay lihilay ! :P
    -AAnonymous

    ReplyDelete