माझ्या मित्राने माझ्या घरचा दूरध्वनी क्रमांक "दीपिकेची आजी" या नावाने
लिहिला होता. त्यावरून आमचे "दीपिकेची" शब्दप्रयोग बरोबर की "दीपिकाची"
शब्दप्रयोग योग्य यावर चर्चा झाली. त्याच्या मताप्रमाणे आपण "सीतेचे",
"कौसल्येचा", "राधेच्या" असे शब्द वापरतो तर दीपिकेची असं का म्हणू नये.
त्यावर मी म्हटले की या सर्व स्त्रिया देवी अथवा पूजनीय स्त्रिया आहेत,
तर कदाचित त्यांची नावे वेगळ्या रीतीने घेतली जात असावीत. खरं तर संस्कृत
ही मराठीची जननी आणि संस्कृत मध्ये देवी आणि सामान्य स्त्रियांमध्ये
व्याकरणाच्या दृष्टीने भेदभाव केला जात नाही. मग मराठीत असे काही आहे का
याचा शोध चालू आहे. संदर्भ म्हणून आरत्या अथवा जुनी गाणी (म्हणजे गीतकार
मराठीचा/च्या खंदा माहितगार असतील असे मानून) ग्राह्य धरली जातील. लगेच मनात "मायेच्या हळव्या" गाणे आले, पण येथे
माया हे मुलीचे नाव या अर्थी नसून abstract noun आहे. देवी नसलेल्या मुलीचे
नाव असलेले गाणे म्हणून चटकन "अश्विनी ये ना" च आठवतंय. एरव्ही गाण्यांत प्रिये, सखे असे आपुलकीचे शब्द असलेली बरीच गाणी आढळून येतात.
बरं सारख्या अर्थाच्या शब्दांमध्ये पण दोन्ही प्रयोग दिसतात, "गंगाजल" Vs "कऱ्हेचे पाणी" म्हणजे संधी झाली तरी प्रयोग बदलतोय. "गंगेकाठी" Vs "कृष्णाकाठ" यात निव्वळ ज्या शब्दाशी संधी झाली त्या शब्दाची case बदलली तरी प्रयोग बदलतोय.
विचार करता करता लक्षात आलं की ही सापत्न वागणूक देव्यांनाच नाही तर देवांना आणि संतांना देखील लागू होते. "कबीराचे" शेले, "रामाच्या" राज्यात, "राधा कृष्णावरी भाळली".. देवांचं नाव "अ"कारांत असलं तरी त्यांना प्रत्यय लावताना त्यांच्या नावाचा "आ"कारांत होतो.
त्याहून पुढे जायचं तर हीच प्रथा आपण निर्जीव गोष्टींना देखील लागू केली आहे. दारची तुळस, मात्र दाराची कडी. एखादी गोष्ट सोपी असली की ती जणू "हातचा मळ", पण गप्प बसताना मात्र "हाताची घडी" तोंडावर बोट. थोडक्यात काय तर मनात आपुलकी असली की ती भाषेत उतरते. मग असं असेल तर मित्राने "दीपिकेची आजी" म्हणलं तर मी त्याच्या व्याकरणाच्या चुका न काढता त्याचा जिव्हाळा समजून घ्यावा हेच श्रेयस्कर.
वाचकांनी देखील ह्या कार्यात सहाय्य करावे… मंडळ आभारी आहे :)
References:
१. स्वयंवर झाले सीतेचे, गीतरामायण
२. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम
३. "राधा अंजिरी साडी ल्याली, रंग गुलाबी राधेच्या गाली" ही आजी गाते त्या गाण्यातली एक ओळ
४. "कऱ्हेचे पाणी", प्र.के. अत्रे
५. "गंगेकाठी घर हे अपुले", कल्पवृक्ष कन्येसाठी गाण्यातली ओळ
६. "कृष्णाकाठ", यशवंतराव चव्हाण
दीपिका विद्याधर रानडे
title (वि)भक्ती द्यावं असा मानस आहे

तुझ्या ब्लॉगवर API Error अजूनही येतोय.
ReplyDeleteमी शाळेत असताना विभक्ती शिकलो आणि थोडेफार व्याकरण सुद्धा. मेकोलेच्या पद्धतीत सारे काही नियमात बांधायची आपल्याला सवय लागलीये. तुझा या लेखातला खटाटोप त्याच गणतीत आहे. असो.
विभक्तीप्रत्यय लावताना मूळ नामात किंवा सर्वनामात बदल होतोय, हे पहिल्यांदा सातवी-आठवीत लक्षात आलं माझ्या. मग जरा धुंडाळल्यावर वाटलं, की सीतेचे (सीता), बेमट्याला (बेमटा), नाशकात (नाशिक), मिरजेहून (मिरज), तेंहून (तो-ते), त्याच्याशी (तो) असे शब्द आपण एखाद्या गोष्टीला अरे-तुरे करतो की अहो-जाहो करतो यावर घडतात. यात ते नाम कसले आहे, का आहे, किती महत्वाचे आहे, याचा काही संबंध येत नाही. अर्थात, या अरे-तुरे आणि अहो-जाहो फरकाला अपवाद असतील, आहेत. पण, ते अपवाद आहेत किंवा अपवादाचे गट आहेत. एवढं मला माहितीये.
बाकी हा लेख फारसा चांगला नाही झालेला. "प्रयोग बदलतोय", हे व्याकरणासंबंधी बोलताना नेमके आपण प्रयोग (वापर) म्हणत आहोत की वाक्याचा अर्थ लावत आहोत (कर्तरी-कर्मणी-भावे) याचे भान ठेवले असतेस तर बरे झाले असते. वाचकाचा गोंधळ आणि कदाचित गैरसमज होऊ शकतो. संधी आणि समासात किंचित गल्लत झालीये. संदर्भात व्याकरणातले काहीच नाहीये. असो.