४ . Trigger happy individuals
पहाटे पहाटे ६ ला एक फोन आला - मी अहमदनगर हून डॉक्टर So and So बोलतोय. त्या १ मिनटात अक्षरश: heart attack च्या पुढे मागे जे काही सगळे अवयव थिजायची प्रक्रिया असते ती अनुभवून झाली. पण छे छे, कोणतीही वाईट बातमी सांगण्यासाठी नव्हता तो फोन, "आमचा मुलगा डॉक्टर So and So" याच्या स्थळासाठी त्याच्या बाबांनी मला फोन केला होता. Unfortunately नगरचा आणि डॉक्टर माणूस म्हणून ६ वाजता दचकून उठल्यावर देखील मी त्यांच्याशी आदबीने बोलले. सर्वात height म्हणजे असंही नाही की त्यांना US - India time conversion माहिती च नाही, कारण त्यांचा मुलगा Virginia ला असतो.
मनात आलं स्वतःच्या मुलाला तरी सकाळी ६ वाजता फोन करायची हिम्मत झाली असती का त्यांची? मग ज्या वेळेला मुलाला फोन करू नये अश्या वेळी अनोळखी मुलीला फोन करवतोच कसा? दिसली profile आवडली profile, दिसतोय फोन नंबर तर लावला लगेच फोन? लग्नाच्या आधी तर सोडाच मुलीला approach करतानाच तिच्या वेळेची तिच्या झोपेची ज्यांना काडीमात्र किंमत नाही आहे ते लोक लग्नानंतर काय जाच करतील याची कल्पनाच केलेली बरी.
अजून काही आयांनी रात्री १२ नंतर, किंवा सकाळी १० वाजता office मध्ये असताना वगैरे फोन केलेत - ते आता या तुलनेने खूपच mild वाटतंय. (त्यातून आयांनी किती वाजलेत कळल्यावर at least sorry म्हणलं होतं)
P.S: खूप आधी मी एकदा एका मित्राला २ वाजता वगैरे फोन केला होता. In my defense, त्याआधी त्याने मला West Coast वरून सुट्टी असताना फोन केला होता, म्हणून नंतर मी सुमारे त्याच वेळेला त्याला फोन केला, तेव्हा नेमका तो CST ला होता. And again in my defense, हे सगळे PST/ CST/ EST चे किडे माहिती असायला त्या वेळी माझं कोणीही सख्खं US ला नव्हतं.
५. संसार Vs career
आज मी कोणत्याही दृष्टीने मुलगा -engineer पेक्षा कमी नाही आहे, किंबहुना IQ Test च घ्यायचीच झाली तर I am among the top 1000 students of all branches in my batch in the nation, तर माझ्या batch च्या ६ लाख engineers पैकी किमान ५.५ लाख Engineers पेक्षा मी नक्कीच जास्त हुशार आहे. पण Shaadi.com वर profile टाकली रे टाकली, आणि मला एका US Master + Qualcomm Engineer मुलाने प्रश्न विचारला की "I seem to be very focused and career-oriented, then what made me open an account on Shaadi.com." आता याचे २ connotations निघू शकतात :माझं career भारी चाललय म्हणून माझ्या आई बाबांनी मुलगा पहिला पाहिजे (जे मला हास्यास्पद वाटतं) किंवा माझं career एवढंच जर भारी चाललय तर मला लग्न का करायचंय (आवरा!!!!)
आणि घरी आल्यावर हातात चहा देणारी बायकोच पाहिजे असेल तर मुलांनी Expectations मध्ये Engineer लिहू नये. मुलांनी संसार + career आणि मुलींनी मात्र (particularly मुलं झाल्यावर) संसार अथवा career हा काय न्याय आहे?