Tuesday, February 10, 2015

14 February आणि आपली संस्कृती

१. प्रेम विवाह आपल्या संस्कृतीत बसत नाही
पूर्वी सामान्य लोक कसे जगायचे ह्याच आपल्याला काही ज्ञान नाही अहे. तेव्हा आजच्या सारखे blogs देखील नव्ह्ते. आपल्याला जे माहिती ते रामायण महाभारत पुराण आदी वाचून. पण मजा म्हणजे रामायण महाभारतात देखील राजघराण्यातले लोक कसे राहायचे ह्याचेच वर्णन आढळेल, सामान्य माणसाच्या जीवनाचे नाही.  महाभारतात पांडवांचे १८ औक्षाहिणी सैन्य होते, म्हणजे १८० लक्ष सैन्य होते. त्यातून आपण जास्तीत जास्त हजार व्यक्तिरेखांबद्दल वाचलय. म्हणजेच १०००/(१८*१०^ ६) = ०. ००५५%. एवढ्या कमी sample set मधून आपण प्रेम विवाह होते किंवा नव्हते याचा काहीच अंदाज लावू शकत नाही.
आता ज्या व्यक्तीरेखान्बद्दल आपणास माहिती आहे त्यांच्या कडे वळू. सुभद्रेचे अर्जुनावर प्रेम जडलें. बलराम दादांनी तिचे लग्न इतरत्र ठरविले. कृष्णाच्या मदतीने सुभद्रेने अर्जुनाशी प्रेमविवाह केला. रुक्मिणीचे देखील कृष्णावर प्रेम होते, असे तिने कृष्णास प्रेमपत्र लिहून कळविले, कृष्णाने चक्क तिला रुक्मी च्या नाकाखालून पळवून आणले.

२. परप्रांतीयाशी लग्न करू नये
गांधारी कंदहार देशाची राजकन्या होती, तर हस्तिनापुर म्हणजे आजची दिल्ली. त्याकाळी इतक्या लांबची राजकन्या बायको म्हणून चालत होती तर आपल्याच देशातल्या कुणाशी लग्न करण्यात काय गैर आहे?

३. मुलीनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले
वर म्हणल्या प्रमाणे सुभद्रा आणि रुक्मिणी दोघींनी आपल्या मोठ्या भावाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले.

४. मुलीनी वर निवडताना चोखंदळपणा दाखवला
द्रौपादिनी भर सभेत कर्णाशी लग्न करायला नकार दिला. सभेत कोणीही तिला "आगाऊ मुलगी" वगैरे label लावलं नसावं.

५. आंतरजातीय विवाह
भीमाने हिडीम्बेशी लग्न केला, म्हणजेच मनुष्याने so-called राक्षस वंशीय मुलीशी लग्न केलं. पुरूरवा-उर्वशी यांची कथा सर्वश्रुत आहेच. तसेच ययाती या राजाने देवयानी या आचार्य-कन्येशी लग्न केले. शकुंतला ही adopted मुलगी, गुरुकुलात वाढली तर कदाचित ती स्वतःला ब्राह्मण समजत असावी. आज ज्या राजामुळे आपण आपल्या देशाला भारत म्हणतो त्या भरत राजाच्या आई-वडिलांनी आंतरजातीय विवाह केला म्हणायचा.


2 comments: