स्थळांचा शोध करताना एक filter मनाशी ठरवला होता, तो म्हणजे मुलाने काही काळ तरी घरापासून दूर राहिले असले पाहिजे. चहा वगैरे आदेश न सोडता किमान मुलगा स्वतःचा चहा तरी स्वतः करून पीत असावा अशी अपेक्षा! (अर्थात कोणी नितांत आळशी असेल तर आजकाल चार पैसे देऊन गोष्टी घरपोच मिळवता येतात ती गोष्ट वेगळी.) बायको घरी दमून येते तर आपण ५०-५० मदत केली पाहिजे असं मुलाला वाटेल तरी. गेली अनेक वर्ष आई कामावरून घरी येऊन जेवण बनवते. काही दिवसांनी मी घरी जाईन तेव्हा आईच्या हातचं खायला अगदी आतुर आहे. सुटीसाठी मी घरी जायचं आणि आई जेवण बनवून घालेल अशी अपेक्षा बाळगायची हे बरोबर पण हेच जर नवऱ्याने केले तर नवरा मात्र chauvinist. Talk about conveniences! स्वतःचे double standards ओळखायला पण निखळ दृष्टीकोन लागतो म्हणलं.
No comments:
Post a Comment