सहज गुणगुणताना गाणं मुखी आलं : नित्यानंद स्वरूपी सम दृष्टी सर्वांसाठी, दोषमुक्त आदिशक्ती माउली मुक्ताई. मागे दूरदर्शन वर मुक्ताई नामक मालिका असायची त्याचं हे द्योत-गीत. विचारांची मालिका ह्या गाण्यावरून सुरु झाली. मनात दुसरं गाणं आलं, "ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता". वाटलं त्या काळी कोणी चाकोरीबाहेर वागलं तर त्यालाच काय त्याच्या निष्पाप मुलांना देखील वाळीत टाकलं जायचं. आज तरी काळ कुठे बदलला आहे?
मागे facebook वरचे काही प्रसंग, केजरीवालांना डोक्यावर धरायचे दिवस होते तेव्हा सगळे जणू केजारीवालचे PR machines होते. मग त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्यावरची जनतेची छत्रछायाच उडाली. मग पप्पू ची खिल्ली उडवायचे सुदिन आले, आणि चुकून एखादं काँग्रेस च सत्कृत्य कोणी चारचौघात उच्चारलं तर त्याची facebook वर अगदी टर उडवली जात असे. काही दिवस होत नाहीत तोच काही देशात इतरत्र राहणाऱ्या ईशान्य भागातल्या भारतीयांचा जीव ते बाकी भारतीयांसारखे दिसत नाहीत म्हणून लोकांनी मेटाकुटीस आणला. एवढं कमी होतं की काय म्हणून माझ्या सुधारकांच्या महाराष्ट्र राज्यात भर दिवसा नरेंद्र दाभोलकरांची हत्या होते. का तर म्हणे अंधश्रद्धेला हात घातला तर लोकांची श्रद्धा डळमळीत होते.
संगणक घरोघरी पोचल्यापासून लोकांना virtual bullying करायला आयतं साधन मिळालंय. आता कोणी एखादी अप्रिय comment केली तर हमखास एक तरी comment "आधी नीट इंग्रजी लिहायला शिक मग इथे बोल" या आशयाची असते. कोणाला जर इंग्रजी येत नसेल तर काय मत व्यक्त करायची त्याची लायकी नाहीये?
"People unlike us" ना कमी लेखायचं आपण अगदी बालवयापासूनच शिकलोय. मी अहमदनगर हून पुण्यात आले, तेव्हा शाळेतली बाकी मुलं KG पासून एकत्र होती आणि त्यांच्यासाठी मी "outsider" होते. काही वर्षांनी माऊ शाळेत नव्याने आली तेव्हा तिला आमच्यापेक्षा जास्त चांगलं संस्कृत येतं एवढ्या एका कारणानी तिला ओळखतही नसताना तिच्यावर आगाऊपणा च label लावणाऱ्यात मी देखील होते. शाळेत माझ्यानंतर एक वर्षाने, आणि माऊआधी एक वर्ष आलेल्या दुसऱ्या मुलीने आमचं parochial वागणं आम्हाला दाखवून दिलं तेव्हा कुठे आम्ही काहीतरी चुकीचं वागतोय हे तरी आमच्या लक्षात आलं. नशीबाने स्वतःची चूक समजण्याइतके समजूतदार होतो म्हणून आज माऊ माझी जिवाभावाची सखी आहे.
Weird for you might be regular for someone else. लहानपणी रात्रीच्या जेवणात भात अगदी गरमागरम, नुकताच शिजवलेला असायचा. इतका गरम की बोटांना चटके बसायचे आणि चमच्यानी खाण्याची घरी तऱ्हा नव्हती. तेव्हा मी स्वत:पुरतं solution म्हणून पोळीच्या तुकड्याने भात कालावायचे आणि मग तो पोळी-तुकडा भातासोबतच खायचे. घरी कोणी पाहुणा आला की माझा तर उद्धार व्हायचाच पण आईचा पण व्हायचा. त्या सर्व लोकांना खास burrito खाऊ घालायची माझी जाम इच्छा आहे. (ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी: burrito हा mexican खाद्यपदार्थ आहे, ज्यात पोळी च्या गुंडाळीत भात, वाटणे आणि भाज्या भरलेल्या असतात)
पण मी कितीही प्रेमाने त्यांना burrito दिला तरी त्यांनी खायला पाहिजे न!! We are highly resistant to change! मागे मैत्रिण तिच्या घरच्यांसोबत conducted tour ला US ला आली होती, तिथे अख्ख्या trip भर ते लोक फक्त भारतीय खानावळीत जेवत होते! USA ला melting pot म्हणायचं मात्र तरी vietnamese वेगळ्या enclave मध्ये राहणार तर chinese त्यांच्या chinatown मध्ये.
बरं फक्त चार चौघांसारखं असणं एवढा एकच निकष असता तर रंग उजळवणाऱ्या लेपांचा धंदा भारतात इतका तुफान का चालतो? यात पुन्हा छुप्या bullying चा दर्प येतो. आपल्यावर राज्य करणाऱ्याचा रंग काळा असता तर कदाचित आज आपल्याकडे तोंड काळं करणाऱ्या लेपांची चलती असती. मी जसा पोळी भात खाल्ला तसा कोणी ताज च्या chef ने नवा पदार्थ म्हणून काढला असता तर माझ्या समस्त नातेवाईकांनी त्याचं "पूर्णान्न" म्हणून कौतुक केलं असतं.

No comments:
Post a Comment