सुमारे १५ वर्षांपूर्वीची गोष्ट. इमारतीची, बागेची देखभाल करायची जबाबदारी इमारतीत सगळ्या घरांत आळीपाळीने होती. त्या वर्षी ती जबाबदारी ३ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या दादा आजोबांकडे होती. दादा आजोबा
fencing च्या भिंतीवर उभे होते. त्यांनी आधारासाठी चाफ्याच्या फांदीला
धरलं होतं, पण फांदी तुटली आणि दादा आजोबा पडले, आणि त्यांना spinal cord
injury झाली. पुढे अनेक वर्ष ते bedridden होते. माझ्या
आईच्या चुलत बहिणीचे सासरे पण चाफ्याची फुलं काढताना ३ऱ्या मजल्यावरून तोल
जाऊन पडले आणि जागच्या जागी गेले. दोन्ही घटनांमुळे मला त्या चाफ्याचं आणि
त्या so -called सुगंधी फुलांचं कधीच अप्रूप वाटलं नाही.
माझ्या आजीला फुलांची खूप हौस. माझे आजोबा गेल्यानंतर मी तरी फुलं माळून तिची हौस पुरवावी अशी तिची इच्छा असते. तसंही माझ्या वयाच्या मुलींनी केसात फुलं माळण माझ्या लहानपणी (आणि अजूनही) अतिशय tacky होतं. Infact boorish मुलीची पुणेरी insider definition म्हणजे "तेल-गजरा-पावडर"! मी स्वतः एक रानटी गुलाबाचं झाड जगवलं होतं त्यामुळे त्या superbly natural आणि horticulture चा "ह" पण ज्या झाडाजवळ फिरकला नव्हता त्या गुलाबाच्या वासापुढे, आणि अंगणातल्या रातराणीच्या वासापुढे मला बाकी सर्व सुगंध फिके वाटायचे. आता आमच्याकडे येणाऱ्या प्रौढ स्त्री चे स्वागत चाफ्याचं फूल दिल्याशिवाय होत नाही. नशिबाने आई-आजी नी योग्य वेळी चाफ्याजवळच्या गच्चीला grill बसवून घेतलं, पण आजी आता भावाला वरच्या मजल्यावर फुलं काढायला पाठवते.
आजी, "अतिथी देवो भव" मला पण पटतं गं, पण चाफ्याचं फूल दिलं तर तू केलेल्या आतिथ्याला चार चांद लागले असं नाहीये गं. कोण पाहुणा घरी आला आणि घरात पाणी नव्हतं म्हणून तू गच्चीवर जाऊन parapet वर चढून main नळ उघडायला गेलीस. आमचं नशीब म्हणून इमारतीबाहेर चौथ्या मजल्यावरून न पडता गच्चीत आत पडलीस. खरं सांग, त्या पाहुण्याने अंघोळ करणं हे इतकं महत्वाचं होतं की तू गेली १८ वर्षं fractured कण्याचं दु:ख झेलते आहेस?
Namesake माझं आवडतं पुस्तक आहे. त्यात गोगोल भारतीय आतिथ्य आणि पाश्चात्य hospitality चं मूल्यमापन करतो. खूप पदार्थ जेवायला बनवून दमायचं, (इज्जत का सवाल आहे ना! एवढं आम्ही जेवायला गेलो आणि त्यांनी २ चं पक्वान्न वाढली!!) सगळ्यांची जेवणं झाल्यावर घरच्या मोठ्यांनी पाहुण्यांचं नोकर असल्यासारखं जेवायला बसायचं. versus host ने मोजकेच पदार्थ बनवायचे, पाहुण्यांनी पण एक पदार्थ आणायचा, आपण भेटतो आहोत ते दुसऱ्यांनी बनवलेलं चांगलं चुंगलं खायला नाही तर एकत्र भेटायला, हा basic underlying thought .
जन विषयांच्या किड्यांची धाव बाह्याकडेच असणार आहे, फूल देऊन, किंवा किती पक्वान्न बनवले त्यावरून जर आतिथ्याचे मोजमाप होणार असेल तर नाद सोड त्यांचा. तू काहीही केलंस तरी अशी लोकं काहीना काही खोट काढणारच. तेव्हा आतातरी स्वतःच्या वयाला, तब्येतीला जपायला हवं नाही का?
Postscript: As you write more and more personal, it becomes Universal. - Partner, व. पु. काळे

No comments:
Post a Comment