Thursday, March 22, 2012

untitled

परवा कळलं, ECE मधल्या एका भारतीय मुलाला Sexual Offence साठी अटक झाली. एक sting operation होतं म्हणे, पोलिसांनी १३ वर्षीय मुलीचे guardian आहोत असं भासवून जाळं टाकलं आणि त्यात सुमारे २३ लोकं अडकली. या मुलाने म्हणे email केली होती, ज्यात त्याने विचारलं की मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे guardian ने या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. म्हणजे जाणून-बुजून त्याने अल्पवयीन मुलीसाठी!

त्याला नोकरी लागली म्हणून सगळी कागदपत्र मिळवण्याच्या खटपटीत कालपरवा पर्यंत ECE lab मध्ये रोज भेटायचा तो, गेल्या वर्षी एका विषयासाठी एकत्रच होतो वर्गात..  जबरदस्त धक्का असतो ओळखीच्या मुलाबद्दल असं काही कळलं की..
रूमीने  विचारलं- कसा होता तो; माझ्या मते  कसाही असला तरी २ महिन्यात ज्याला नोकरी लागणार आहे तो मुलगा असं काही नाही करू शकत. इथे नोकरी आधी background checking असतं, कोणता मुलगा स्वतःच्या career वर धोंडा मारून घेईल!

दुसऱ्या दिवशी कोणीही भारतीय भेटले की त्यांच्यात त्याचाच विषय निघत होता. सर्वांचं म्हणणं होतं की आता त्याला बराच काळ तुरुंगात काढावा लागेल, किंवा त्याला कदाचित deport करण्यात येईल. पण तरीही if proven guilty त्याचं career संपल्यातच जमा आहे. कसे काढणार तो तुरुंगात दिवस, तुरुंगात बाकी कैदी त्याचं छळ तर करणार नाहीत ना,  काय सांगणार तो त्याच्या आई-बाबांना की का अटक केली गेलीये त्याला! त्याला depression तर येणार नाही ना!  शेवटी रूमी म्हणाली की हा प्रसंग भारतात घडला असता तर आपण त्याला अक्षरशः वाळीत टाकलं असतं, इथे परदेशी घडला म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल, त्याच्या भंगलेल्या career बद्दल सहानुभूती वाटते आहे. तर आपण त्याला पाठीशी घालणं कितपत योग्य आहे!

मध्यंतरी आम्ही मित्र बोलत होतो, तेव्हा कपिलने मत मांडलं की Social Networking sites वर आपण काय काय वाचतो, कशाला पसंती नोंदवतो याची कुठेतरी नोंद होत असावी. (सगळ्या activity ची नाही, फक्त shady activity ची नोंद होत असावी.) त्या अनुषंगाने कोणी भलत्यासलत्या गोष्टींनी प्रभावित होत असेल तर त्याच्यावर बारकाईने e - नजर ठेवता येईल. शशांकने त्याला दुजोरा देत म्हणलं की लोकप्रिय sites वर लोक खरं नाव वापरतात, आणि एका इसमाला एकच account काढता येतो, तर यात नक्कीच काहीतरी तथ्य असावं. Dan Brown ने Digital Fortress मध्ये ही भीती बोलून दाखवली होती. या मुलाच्या संदर्भात मी रूमीला म्हणलं की background check मध्ये कदाचित ही माहिती काढणं शक्य असावं, आणि हे माहिती असताना तो मुलगा असं कसं करू शकतो?

कालपरवा पर्यंत साळसूद वाटणाऱ्याचं खरं रूप काही भलतंच असू शकतं! भय इथले संपत नाही version २ ..

1 comment:

  1. शेवटचा para थोडा खटकला. भीती हा मुद्दा दुय्यम आहे.
    खालच्या २ प्रश्नांचं ज्याने-त्याने स्वतः उत्तर काढावं:

    १. एखादी सुकृती केल्यामुळे आपल्याला कोणी त्रास देईल किंवा इजा करेल, अशी परिस्थिती असताना आपण ती सुकृती टाळणं कितपत योग्य आहे?

    वरील प्रश्न resource limited आहे; त्याहून महत्वाचा प्रश्न पुढील आहे - तो resource limited नाही.

    २. एखादं दुष्कृत्य केल्यावर आपल्याला कोणीच पकडू शकणार नाही, असे असताना आपण ते दुष्कृत्य करू काय?

    तत्त्वहीन मनुष्य श्वापादासारखा वागणारच, म्हणून मूळ प्रश्न हा तत्त्वांचा आहे...

    (P.S.: Excuse the deleted comment. There was some formatting/font error.)

    ReplyDelete