काही दिवसांपूर्वी Gainesville मध्ये असताना Man from the Earth चित्रपट पहिला होता. वेगळी मांडणी आणि प्रत्येकालाच जीवन - मृत्यू बद्दल पडणारे प्रश्न, नक्कीच one of the top Hollywood movies. नुकताच Bicentennial man चित्रपट पाहिला, आणि आवडला सुद्धा. असाच immortality बद्दल विचार + surfing करता करता लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली, बहुदा रत्नाकर मतकरींची असावी - एका माणसाला एक जखमी माणूस भेटतो, तो त्याची सुश्रुषा देखील करतो, पण जखमेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. शेवटी तो सांगतो, कि तोच अश्वत्थामा आहे. लहानपणी या गोष्टीनी मला नक्कीच nightmares आले असणार. पण काही म्हणा ह्या अश्वत्थाम्याच्या गोष्टीनी मला खूपच मंत्रमुग्ध केलंय. हिमाचल प्रदेश मधल्या एका गावात वर्षातल्या ठराविक दिवशी म्हणे ताड माड उंच, आणि आजानुबाहू माणूस येतो. गावातले लोक तो अश्वत्थामा आहे या श्रद्धेने त्याच्यासाठी अन्न राखून ठेवतात. म्हणजे मी एकटीच या कथेनी intrigued नाहीये तर..
सप्तचीरांजीव म्हणजे अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम. चांगदेव देखील योगिक सामर्थ्याने १४०० वर्ष जगले. अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व इतरांपेक्षा वेगळे आहे, शापित आहे.
सप्तचीरांजीव म्हणजे अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम. चांगदेव देखील योगिक सामर्थ्याने १४०० वर्ष जगले. अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व इतरांपेक्षा वेगळे आहे, शापित आहे.
त्यामागची गोष्ट पण बरेच प्रश्न निर्माण करते. साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण हजर असताना २ ब्रह्मास्त्र थोपवायला व्यास महर्षी प्रकट झाले. म्हणजे अवतारी देवापेक्षा एका मनुष्याचे योगिक सामर्थ्य जास्त असू शकते असे तर सुचवायचे नसेल? देव उभा ठाकला आहे ते ठीक आहे, पण तरीही मनुष्यच त्याच्या जीवनाचा शिल्पकार / उद्धारकर्ता आहे ? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर द्रोणाचार्यांना अश्वत्थामा तापट आहे माहिती होतं तर मुळात ब्रह्मास्त्र प्रकट करायला तरी कशाला शिकवायचं? अर्धवट ज्ञानाने अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र म्यान करता आले नाही. पांडवपुत्रांच्या मृत्युच्या बातमीने दुर्योधन देखील व्यथित झाला, संपूर्ण कुरु वंशाचाच संहार झाल्याचे ते दु:ख होते. पण त्याच्या झळा अश्वत्थाम्याला कशा बसल्या नाहीत?
आज अनेक घरी गर्भातल्या अपत्याची हत्या होते. पण त्यांना कोणी जखम घेऊन फिरण्याचा शाप देत नाही! न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति हे आपल्या संस्कृतीच्या लक्षात आहे, पण निष्पाप जीवाची हत्या केल्यामुळे आजन्म तेल मागत फिरावं लागलं हे कसं हीच संस्कृती विसरली. बहुदा सगळ्यांच्या पापांचे व्रण घ्यायचं नशीब एकट्या अश्वत्थाम्याच्याच माथी आलंय.
Nice one... tula padlele prashna vachun matra ashcharya vatla... It is not so inconsistent as your questions put it. I don't see a discrepancy here.
ReplyDelete