Not too long ago, I wrote that moving in US is easy. I was totally wrong. इथे
विम्याशिवाय गाडी चालवता येत नाही. (असं फक्तं कागदोपत्री कायद्याच्या फुशारक्या मारण्यापुरते, कारण विमावाले "1 in every 7 drivers is uninsured" असं सांगून Uninsured Motorist coverage आपल्या माथी मारतात).
विमा बदलायला २ आठवडे बाकी असताना मी FL तून CA ला आले. सिलिकॉन valley ची जनसंख्या एवढी अफाट की RTO ची appointment मिळण्यात एक महिना गेला. म्हणून CA ची license plate घ्यायच्या आधीच CA चा विमा घेतला गेला. विमा वाले विमा घेतल्याचं संबंधित RTO ला कळवतात, पण मला अजून CA चा परवाना मिळाला नव्हता, म्हणून त्यांनी FL च्या RTO ला कळवलं. नावाला जरी हे "United states" असलं तरी प्रत्येक राज्याचे वेगळे कायदे. CA आणि FL चे विमाविषयक निकष वेगळे, आणि त्यातून नेमकं FL ला अपेक्षित असलेलं एक परिमाण घ्यायचं राहून गेलं. खरं तर राज्य सोडून जाताना त्या राज्याची license plate परत करायची असते. पण CA च्या RTO वाल्यांनी माझी FL ची plate ठेऊन घेतली. (आणि ती FL ला पाठवयचं विसरले असणार !!) विमा वाले, CA RTO यांनी माझ्यासारखे अनेक cases हाताळले असतील असे समजून मी निर्धास्त राहिले. पण मधल्यामध्ये मी आता FLत राहत नाही याची FL ला काही खबर नव्हती.
FL च्या दीड शहाण्या लोकांनी परस्पर माझा चालक परवाना रद्द केला. लगोलग माझा CA चा परवाना देखील आपोआप रद्द झाला. इतक्या काळात मी "CA ला येउन अनेक दिवस झाले तरी FL ची पाटी लावून फिरते" म्हणून तिकीट भरून आले, Oregon ला भाड्याची गाडी करून फिरून आले, सहा महिन्याने अजून एकदा नवीन विमा घेतला.. त्यावेळी माझा परवाना कोणी तपासला नाही? हेच का त्यांचं नावाजलेलं संगणकीय कर्तृत्त्व? शेवटी अजून एकदा विमा घ्यायची वेळ आली आणि भारतीय विमावाल्याने आपुलकीने माझी case पाहिली तेव्हा हा घोळ लक्षात आला. शेकडो फोन करून, प्रत्येक फोन वर अर्धा अर्धा तास त्यांचं तुणतुणं गाणं ऐकून, शेवटी एकदा सगळं नीट झालं. हा चार आण्याच्या घोळ निस्तरायला मला विम्यासाठी २०० रुपये अधिक पडले!
तात्पर्य: जो दुसऱ्यावरी विसंबला………
ता. क. : Quoting my Bachelor's classmate Shruti J, insurance business policy is "Reject insurance for those who might claim it..and accept for those who might never need it"

No comments:
Post a Comment