New Year च्या सुमारासच university मधली एक भारतीय मुलगी cardiac arrest ने गेली.. तिचा FB page नव-वर्षाभिनंदनाऐवजी RIP नी भरला होता. इथे बसून काय झालं असेल त्याचा आम्ही फक्त तर्कच लावू शकत होतो. काल बाकी लोक परतले, त्यांच्याकडून कळलं. भारताला विमानातून जाताना त्या मुलीला Deep Vein Thrombosis झाला. २ दिवस वेदना सहन केल्यावर ती डॉक्टरकडे गेली, पण तोवर ती गाठ हृदयापर्यंत पोहोचली. Shock ! कोणी असं तडकाफडकी कसं जाऊ शकतं...
आमच्या सोबत आलेले बरेच लोक सुट्टी साठी भारतात गेलेले, घरटी एक एक जण असावा. भारतात आजूबाजूला हजार लोक असायची इतकी सवय झालेली.. इथे अचानक सगळं भकास आणि घाबरवून सोडणारं.. वरून Wiki आहेच इथे घडलेल्या कृष्णकृत्यांची माहिती द्यायला..
सुट्टीसाठी एका मैत्रिणीकडे तिची बहीण आलीये. अंडी उकडताना चुकून microwave चं दार उघडलं आणि काही कळायच्या आत उकळते पाणी चेहऱ्यावर उडून 2nd degree burns . थोड्याच दिवसांसाठी येणार म्हणून Insurance पण नाही..
College सुरु झालं तसं नव्या batch ची मुलं परतली. असेच आम्ही गप्पा मारत असताना एक जण म्हणाला की एका माथेफिरूमुळे बेत अर्ध्यावर रद्द करून त्याला Mt Raimier वरून परतावं लागलं. त्या माथेफिरूने तिथे पोलिसांवरच गोळीबार केला. तो सांगत होता की पोलिसांनी सगळ्या campers ना armoured cars ने परत आणलं.
भारतातून batchmates परतल्यावर एक get -together होते. जाता-जाता एका घरी डोकावलो तर तिथे मित्र त्याचा camera शोधत होता. त्यांचा wireless router पण गायब! सगळ्यांचच सामान unpacking मुळे अस्ताव्यस्त पसरलेलं, तरीही जाणून बुजून उचकटलं आहे ते लक्षात आलं. खिडकीची जाळी काढून घरात घुसून हात साफ केला गेला होता तर..
सगळंच अनपेक्षित.. छोटे बडे शहरोंमें छोटी मोटी वारदातें होती रहती हैं.. सरता संपत नाही..
ग्रेसच्या नितांत सुंदर कवितेचा इतका वेगळा वापर--
ReplyDeleteMmm, नाही आवडला