As my roomies return from their month long stay in India, thoughts and memories rush to me. This is how my India trip would have been if I had gone home with my roomies..
Home coming च्या बऱ्याच गोष्टी ऐकून आहे. स्वामी विवेकानंदांनी येताक्षणी भारतीय मातीला घातलेला दंडवत ते इथल्या lifestyle ला सारवलेल्यानी मुंबई विमानतळावर विमान land होताच धारावीच्या वासानी मुरडलेलं नाक at the opposite end of the spectrum! ज्या भूमीनी इतकी वर्ष पोसलं त्याचा कण अन कण, स्पर्ष अन स्पर्ष मला हवासा आहे. इथे येताना, नव्या आयुष्याची सुरुवात करताना एक कण रडायचं नाही बजावलं होतं.. आता आई बाबांना बघून बांध घालणं " मुश्किल हि नहीं नामुमकिन" आहे.
घरी पोचल्यावर आई पायांवर दूध आणि पाणी घालेल, मग पाय ओला असतानाच त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढेल. आजी दारातच दृष्ट काढून मगच घरात घेईल. Roomy च्या घराला नवा रंग दिलाय कळलं तेव्हाच मी आईला विचारलं की आपल्या घरी काय काय बदल झालाय. दीड वर्षांनी स्वतःचं घर बघणं हा पण एक सोहळाच आहे. एकदा स्वप्नात Dallas चं घर आलं होतं, Dallas सोडून ३-४ महिने झाल्यावर. स्वप्नात सुद्धा घर अगदी जसं होतं तसंच दिसलं. ज्या घरात मी १२ वर्ष राहिलीये ते घर मी कसं विसरीन मग? भिंतीच्या रंगासकट सगळं मी जाताना जसं होतं तसं अलवार मिटलेल्या डोळ्यांनी दिसतं...Hall मधले माझे sketches , माझा पलंग, त्यावरची geometric print ची गुलाबी बेडशीट, माझा संगणक , बाल्कनीच्या grill वर बसायची माझी हक्काची जागा..मधूनच आत येणारी चिमणी..
येतीलंच आता माझ्या roomies , पण मी आधीच जाऊन मनानी एक फेरफटका मारून आले.. Faster than light :)
सुंदर! हा लेखनप्रकार तुला 'जमलाय'... एखाद्या चांगल्या दिवाळी अंकात नक्की खपेल असे लिहू शकतेस.
ReplyDeleteKudos!
jamlay ranande
ReplyDelete