Monday, January 30, 2012

ISKCON

वाढदिवसाच्या सुमारास तरी निदान देवदर्शन करावं असा हेतू / मन्नत. इथलं एकुलतं एक मंदिर  म्हणजे ISKCON मंदिर घरापासून २२ मैल दूर. गेल्या वर्षी जायचं ठरलं तेव्हा College senior ने सांगितलं की University जवळच्या कृष्ण house मार्फत मंदिरात घेऊन जायची व्यवस्था आहे. या वर्षी सुद्धा मी कृष्ण house च्या Ride Co-ordinator  शी संपर्क साधला. तर त्याने मला दुपारी ३.३० ला पोहोचायला सांगितलं.  तेव्हा २.३० वाजले असतील, मी बाहेर होते, दुपारचं जेवण देखील झालं नव्हतं. इथे बस रविवारी दर तासाला असते. म्हणजे पुढची बस ३.३० ला निघून मी ४ ला कृष्ण house ला पोहोचले असते. मी त्याला माझ्यासाठी थांबायला सांगितलं. तो बोलला की इतरांना थांबायला सांगणं काही जमणार नाही त्यामुळे मी पुढच्या रविवारी यावं. 

अजून तरी कोणी मन्नत postpone केल्याचं ऐकिवात नाही. मी माझ्या मित्रांना सायकल मागितली. दोघांची सायकल चोरीला गेलेली. एका मित्राची सायकल माझ्या घराखालीच लावलेली. एक महिना तिला कोणी पाय पण न लावलेला. बाकी लोकांकडे सायकल नाही म्हणून मी सहज बघते तो काय! त्या सायकल मध्ये बऱ्यापैकी हवा होती. मग मित्राकडे किल्ली मागितली आणि खाश्या स्वाऱ्या सायकल वरून निघाल्या. अर्ध्या वाटेला पोहोचेपर्यंत ३.३० होत आले होते. 

college मध्ये असताना प्रोफेसर आमच्याशी तुसडेपणानी वागायचे. जणू काही त्यांच्या गावीच नव्हतं की college विद्यार्थ्यांमुळे चालतं,  प्रोफेसरांमुळे नाही. ज्या मुलांसाठी college बनवलंय ती मुलंच college च्या वाईट publicity मुळे college मध्ये दाखल झाली नाही तर ना college राहील ना प्रोफेसरांची नोकरी. इथे पण मला तोच attitude दिसला. ज्या भक्तांसाठी गाडी ठरवायची त्या भक्तांनाच येऊ नका म्हणलं तर कसं! मनात म्हणलं की गाडी त पोहोचल्यावर बाकी लोकांना विचारलं पाहिजे की खरच त्यांना ५ मिनिट थांबायला काही त्रास होता का. आणि खरच इतकी भक्ती असेल की ५ मिनिट देखील थांबवत नसेल तर अश्या भक्तांना इतरांच्या भक्तीचा आदर पण असायला हवा. 

एव्हाना मी बरीच दमले होते. एकतर सायकल मध्ये त्यामानाने हवा कमी होती. वरून त्याची chain अलगद ना फिरता अडकून अडकून आचके देऊन फिरत होती. ही कोणती प्रेरणा आहे की मी आज सायकल चालवते आहे? कोणत्या प्रेरणेने मला ही सायकल बघावीशी वाटली! बस उपलब्ध असताना मला श्रम करत जावंसं वाटतंय असं काय खास आहे त्या देवळात? कोणत्या अन्तः प्रेरणेने दर वर्षी वारकरी शेकडो मैल चालत जातात. मनात अनेक प्रश्न. मी सुमारे ३.३६ ला तिथे पोहोचले आणि आम्ही निघालो. 

ISKCON च्या ख्याती प्रमाणे अतिशय जोरात चाललेल्या भजनावर लोक नाचायला लागले. उद्वेगाने कानावर हात ठेवले, पुन्हा मनात आलं, की भारतात होत नाहीत का जोर-जोरात कीर्तनं? की वारीत लोक रिंगण वगैरे करताना नाचत नाहीत? मग इथे येऊनच मी मनाची कवाडं उघडी ना ठेवता का Conclusions काढते आहे. तासाभराने Open  House सुरु झालं. यंदा भारतीय वक्ता होता, श्रोते सुद्धा active participants होते. श्रोत्यांकडून प्रभुपादांच्या कथांचा उल्लेख चर्चेच्या अनुषंगाने आला. मी नव्याने आले म्हणून मला भगवद्गीतेची एक प्रत देण्यात आली. मग प्रसाद आणि मग परतीचा प्रवास.

प्रवासात देखील संवाद रंगला होता. आमच्या अमेरिकन माताजींच्या मते गीता As it is समजून घेतली पाहिजे == प्रभूपादांच version तेच सर्वोत्तम. जसं की माताजींनी म्हणलं की "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" चा अर्थ काही लोक शरीर असं लावतात, आणि गीता ही एक allegory मानतात.  माझ्या मते संस्कृत मध्ये एकाच शब्दांचे अनेक अर्थ असतात. प्रत्येकाला जो अर्थ कळतो/ भावतो त्याप्रमाणे तो त्याचा अर्थ लावतो. त्यामुळे आपण जितके वेगवेगळे versions वाचू तितकं चांगलं.  काही दिवसांपूर्वी इथे Community सत्यनारायण पूजा झाली होती. तेव्हा पुजाऱ्याने "स्नेह" या शब्दाचे अर्थ सांगितले. देवाला तूप वहायचं या पेक्षा देवाला प्रेम अर्पण करायचं हे मला जास्त पटलं होतं. तसंच आत्ताही  मला हा शरीर allegory वाला अर्थ खूपच मार्मिक आणि योग्य वाटला. 

रात्री घरी आल्यावर गीता वाचण्यास उघडली. आठवलं की माझी क्रिस्ती roommate रोज पानभर तरी बायबल वाचल्याशिवाय झोपायची नाही. किंवा सकाळी ५ ला च उठून meditate करताना बायबल वाचायची. मग हिंदू धर्मात कोणी तरुण असा गीता पाठ का करत नाही? Out  of  fashion  / outdated वाटतं म्हणून ? धर्मासाठी positive support group निर्माण करायला हिंदू धर्म का मागे पडलाय?
Charity begins at home. सुरुवात स्वतःपासून करायची ठरवलीये. वाढदिवसासाठी नवे resolution .. संस्कृत चं थोडाफार ज्ञान आहेच.. गीता मला जशी कळली, पटली तशी.. 

2 comments:

  1. दीपिका,
    तुला मनाप्रमाणे मंदिरात जाता आले हे ऐकून खूप बरे वाटले. ते करायला तुला कष्ट पडले पण मनातली इच्छा प्रबळ असेल तर देव सुद्धा कोणत्याही मार्गाने वाट दाखवतो आण्ही इच्छा पूर्ण करतो. तुझे हे लिखाण वाचुन खूप चान वाटले. मला एका काकूंनी इकडे अमेरिकेत भाग्वाद गीता दिली होती. ती वाचणे मला काही शक्य झाले नाही. पण तू म्हणतेस ते अगदिच पटते मला..कि इतर धर्म प्रमाणे आपण असे दररोज वेद पठाण वगैरे का नाही करत. मी लवकरात लवकर माझा कढे असलेली गीता वाचायला सुरवात करणार आहे. बघू कधी आळस घालवून, योग येतो ते....

    Thanks
    नम्रता

    ReplyDelete
  2. गीतेचे ज्याचे त्याचे version झाले आहे, तुला तुझे गवसेल, गवसो!
    गीतेचा विषय निघालाय, तू व्यासपर्व वाचले आहेस का? दुर्गाबाईंचे.

    काही ठिकाणी अत्यंत सुमार पद्धतीने लिहिले आहेस. तो बोलला, चोरीला गेलेली, घराखालीच लावलेली.. ?

    ReplyDelete