Sunday, July 21, 2013

दृष्टी

 घरी बसून असंच बोर होत होतं, त्यातून बस पास तर काढलाय पण महिनाभर निघायच्या वेळी नेमका पाउस असायचा, म्हणून पास असाच पडून होता. इथून ३६ मैल दूर असलेल्या गावापर्यंत बस जाते, म्हणून तेथील एखाद-दोन संग्रहालय बघून येण्याचा घाट घातला. शनिवार म्हणल्यावर उशिरा उठणार, पहिली बस सुटणारच, दुसरी बस त्यातल्या त्यात वेळ वाचवून पकडावी म्हणून विमानतळापर्यंत गाडीने गेले आणि अगदी चुकता चुकता बस गाठलीच. 

Plan:
१०  - १२ : बस १
१ २ - ३ : संग्रहालय
३-५ : शेवटची बस ३ वाजता सुटते आणि ५ ला घरी पोहोचते. ती बस चुकली तर ४ ला अजून एक बस २५ मैल दूरच्या मधल्या एका गावी सोडेल. हे दुसरे गाव gives me dangerous vibes, म्हणून मला शक्यतोवर ३ ची बस गाठायची होती. एक संग्रहालय मी आणि खेयानी पूर्वी जाता-येता बाहेरून पाहिलं होतं म्हणून परतीची बस चुकलीच तर मला घ्यायला कुठे यायचं ते खेयाला hopefully माहिती होतं.

 "कमजोर कडी" एकाच बस वर अवलंबून आहे म्हणल्यावर मी सायकल न्यायला हवी होती, पण असाच plan मागे एकदा मी पार पाडला होता म्हणून जरा overconfidence झाला.
चुकले कुठे: संग्रहालयात जायला 12 वाजता बस २ पकडायची होती. म्हणजेच परत यायची बस २ गाठायला संग्रहालयातून २ वाजताच निघायचं होतं. म्हणजे खरी "कमजोर कडी" मी हेरलीच नव्हती. 

संग्रहालय १ ठीकठाक च होते. ते म्हणे अठराव्या शतकात ते गाव कसे होते व त्यातले लोक कसे राहायचे याचे जतन करणारे संग्रहालय होते. म्हणजे लहान मुलांचे कपडे, दुपटी, स्वयंपाकघरातली उपकरणे, नकाशे अश्या गोष्टी त्या संग्रहालयात होत्या. जाता जाता मी त्यांच्या वहीत लिहिले - माझे घर देखील आज १०० वर्षांचे आहे. आज घरातल्या अनेक outdated गोष्टींना मी भंगार समजत होते, तोही एक वारसा आहे याची दृष्टी मला या संग्रहालयाने दिली. (म्हणजे चोर चिलटांनी भले थोरले पितळी घंगाळ वगैरे गोष्टी already लुप्त केल्या आहेत, बाकी जे उरले ते जतन करायची दृष्टी).

संग्रहालय २ अक्षरश: शेजारच्या गल्लीत होते. हा space coast असल्याने space programs शी संलग्न अनेक गोष्टी या संग्रहालयात आहेत. हे खूपच मनोरंजक व माहितीदायक संग्रहालय आहे. जाता येता असेच "Liberty Bell Museum" दिसले होते पण "Liberty bell" कौनसा pokemon आहे ते मला येथे कळले. सुमारे 1.50 वाजता मी निघाले. त्या curator स्त्रीने मला बस कुठे मिळेल ते दाखवलं. पण अस्मादिकांना त्या स्त्री पेक्षा स्वतःच्या Iphone वर जास्त विश्वास! तर मी Iphone ने दाखवलेल्या बस थांब्यापाशी, म्हणजे संग्रहालय १ जवळ उभी राहिले. १५ मिनटात मला बस शेजारच्या गल्लीत जाताना दिसली. घाई घाईत डबा कोंबून मी नीट विचार करेपर्यंत बस चुकली होती!

4G वर संग्रहालयात कसं जायचं पाहण्यात, घरी बोलण्यात, दोन्ही ठिकाणी Iphone ने photo काढण्यात   battery 45% वर आलेली. मी पुन्हा 4G लावून Taxi वाल्यांचा फोन हुडकून त्यांना फोन करू लागले. पण नशीब पहा! हे गाव २ शहरांच्या मध्ये, म्हणून taxi इथल्या किंवा तिथल्या विमानतळावर सोडण्यापुरती. त्या वेळी ५-६ taxi वाल्यांपैकी कुणाकडेही गावात taxi हजर नव्हती. मी संग्रहालय १ मध्ये गेले आणि तिथल्या (चार) वृद्ध volunteer ना मला बस १ पर्यंत सोडायला सांगितल. त्या वेळी मी सोडून दुसरे कोणीही पर्यटक तेथे नव्हता. तरीही त्यांनी मला ३ च्या आधी त्यांना निघता येणार नाही असे सांगितले. आता मात्र मी जरा रडवेली झाले होते. मी संग्रहालय २ ला फोन लावला. Curator स्त्रीने मी सोडेन असे सांगितले. त्या संग्रहालयात त्या वेळी ७-८ पर्यटक आणि १ मदतनीस होते, तरी देखील ती स्त्री मला सोडायला आली, इतकच नव्हे तर मला बस १ मिळेपर्यंत माझ्यासोबत बसथांब्यावर थांबली. America capitalist देश आहे, स्वतःचा फायदा होणार नसेल तर कोणी काही करत नाही असा काहीसा माझा समज होता. या घटनेने थोड्या अंशी तरी अमेरिकेकडे बघायची नवी दृष्टी लाभली.  

No comments:

Post a Comment