Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Sunday, August 5, 2012

Ashwatthama

काही दिवसांपूर्वी Gainesville मध्ये असताना Man from the Earth चित्रपट पहिला होता. वेगळी मांडणी आणि प्रत्येकालाच जीवन - मृत्यू बद्दल पडणारे प्रश्न, नक्कीच one of the top Hollywood movies. नुकताच    Bicentennial man चित्रपट पाहिला, आणि आवडला सुद्धा. असाच immortality बद्दल विचार + surfing करता करता लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली, बहुदा रत्नाकर मतकरींची असावी - एका माणसाला एक जखमी माणूस भेटतो, तो त्याची सुश्रुषा देखील करतो, पण जखमेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. शेवटी तो सांगतो, कि तोच अश्वत्थामा आहे. लहानपणी या गोष्टीनी मला नक्कीच nightmares आले असणार. पण काही म्हणा ह्या अश्वत्थाम्याच्या गोष्टीनी मला खूपच मंत्रमुग्ध केलंय. हिमाचल प्रदेश मधल्या एका गावात वर्षातल्या ठराविक दिवशी म्हणे ताड माड उंच, आणि आजानुबाहू  माणूस येतो. गावातले लोक तो अश्वत्थामा आहे या श्रद्धेने त्याच्यासाठी अन्न राखून ठेवतात. म्हणजे मी एकटीच या कथेनी intrigued नाहीये तर.. 


सप्तचीरांजीव म्हणजे अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम. चांगदेव देखील योगिक सामर्थ्याने १४०० वर्ष जगले. अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व इतरांपेक्षा वेगळे आहे, शापित आहे. 


त्यामागची गोष्ट पण बरेच प्रश्न निर्माण करते. साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण हजर असताना २ ब्रह्मास्त्र थोपवायला व्यास महर्षी प्रकट झाले. म्हणजे अवतारी देवापेक्षा एका मनुष्याचे योगिक सामर्थ्य जास्त असू शकते असे तर सुचवायचे नसेल? देव उभा ठाकला आहे ते ठीक आहे, पण तरीही मनुष्यच त्याच्या जीवनाचा शिल्पकार / उद्धारकर्ता आहे ? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर द्रोणाचार्यांना अश्वत्थामा तापट आहे माहिती होतं तर मुळात ब्रह्मास्त्र प्रकट करायला तरी कशाला शिकवायचं?   अर्धवट ज्ञानाने अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र म्यान करता आले नाही. पांडवपुत्रांच्या मृत्युच्या बातमीने दुर्योधन देखील व्यथित झाला, संपूर्ण कुरु वंशाचाच संहार झाल्याचे ते दु:ख होते. पण त्याच्या झळा अश्वत्थाम्याला कशा बसल्या नाहीत? 

आज अनेक घरी गर्भातल्या अपत्याची हत्या होते. पण त्यांना कोणी जखम घेऊन फिरण्याचा शाप देत नाही!  न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति हे आपल्या संस्कृतीच्या लक्षात आहे, पण निष्पाप जीवाची हत्या केल्यामुळे आजन्म तेल मागत फिरावं लागलं हे कसं हीच संस्कृती विसरली. बहुदा सगळ्यांच्या पापांचे व्रण घ्यायचं नशीब एकट्या अश्वत्थाम्याच्याच माथी आलंय. 


Sunday, April 1, 2012

2nd attempt to proselytize me..failed

    एक दिवशी मी महाविद्यालयाबाहेर बागेत कृष्ण भोजन करत बसले होते. २ अनोळखी मुली येऊन गप्पा मारू लागल्या. मी कसं क्रीस्तीधर्म स्वीकारला तरच माझा उद्धार होईल वगैरे. बिचाऱ्या मुलींनी चुकीचा बकरा निवडला. मला त्यांनी सांगितलेला प्रत्येक मुद्दा मी खोडून दिला, Logically scientifically अनेक planes वर. तरी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही की हातात Organic Chemistry चा पुस्तक घेऊन फिरणारी मुलगी मला सांगते की Evolution ही फक्त theory च आहे आणि देवानी ६ दिवसात विश्व निर्माण केलं ह्याचे पण म्हणे पुरावे आहेत. ज्याला दिसतं त्याला आपण सूर्य दाखवू शकतो, आंधळेपणाचं सोंग घेतलेल्याला नव्हे ! तरी माझे काही प्रति- मुद्दे त्यांना खोडून काढणं शक्यच नव्हतं, तिने मला त्यांच्या pastor ला भेटायला सांगितलं. जाता जाता विचारलं, आम्ही तुझ्यासाठी काही pay करू का, मनात आलं होतं की म्हणावं की "हो, का नाही! इथे आलेल्या प्रत्येकाचा शिक्षण खर्च तू pay कर! " तर असं आमिष दाखवून भारतात गरिबांना convert करतात तर!

नुकतंच वाचलं की Anne Frank आदि Holocaust मध्ये मारल्या गेलेल्या ज्यूंना एक चर्च मरणोत्तर convert करत असतं. World War II चा इतिहास बदलायचा प्रयत्न! मृत पावलेल्या माणसाच्या इच्छेविरुद्ध! Illogical धर्मांधतेचा कळस आहे हा. धर्मासाठी काय करतील सांगता येत नाही.

Saturday, March 24, 2012

Random Thoughts: चाफा बोलेना

सुमारे १५ वर्षांपूर्वीची गोष्ट.  इमारतीची, बागेची देखभाल करायची जबाबदारी इमारतीत सगळ्या घरांत आळीपाळीने होती. त्या वर्षी ती जबाबदारी ३ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या दादा आजोबांकडे होती. दादा आजोबा fencing च्या भिंतीवर उभे होते. त्यांनी आधारासाठी चाफ्याच्या फांदीला धरलं होतं, पण फांदी तुटली आणि दादा आजोबा पडले, आणि त्यांना spinal cord injury झाली. पुढे अनेक वर्ष ते bedridden होते.  माझ्या आईच्या चुलत बहिणीचे सासरे पण चाफ्याची फुलं काढताना ३ऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडले आणि जागच्या जागी गेले. दोन्ही घटनांमुळे मला त्या चाफ्याचं आणि त्या so -called सुगंधी फुलांचं कधीच अप्रूप वाटलं नाही.

माझ्या आजीला फुलांची खूप हौस. माझे आजोबा गेल्यानंतर मी तरी फुलं माळून तिची हौस पुरवावी अशी तिची इच्छा असते. तसंही माझ्या वयाच्या मुलींनी केसात फुलं माळण माझ्या लहानपणी (आणि अजूनही) अतिशय tacky होतं. Infact boorish मुलीची पुणेरी insider definition म्हणजे "तेल-गजरा-पावडर"! मी स्वतः एक रानटी गुलाबाचं झाड जगवलं होतं त्यामुळे त्या superbly natural आणि horticulture चा "ह" पण ज्या झाडाजवळ फिरकला नव्हता त्या गुलाबाच्या वासापुढे, आणि अंगणातल्या रातराणीच्या वासापुढे मला बाकी सर्व सुगंध फिके वाटायचे. आता आमच्याकडे येणाऱ्या प्रौढ स्त्री चे स्वागत चाफ्याचं फूल दिल्याशिवाय होत नाही. नशिबाने आई-आजी नी योग्य वेळी चाफ्याजवळच्या गच्चीला grill बसवून घेतलं, पण आजी आता भावाला वरच्या मजल्यावर फुलं काढायला पाठवते.

आजी, "अतिथी देवो भव" मला पण पटतं गं,  पण चाफ्याचं फूल दिलं तर तू केलेल्या आतिथ्याला चार चांद लागले असं नाहीये गं. कोण पाहुणा घरी आला आणि घरात पाणी नव्हतं म्हणून तू गच्चीवर जाऊन parapet वर चढून main नळ उघडायला गेलीस. आमचं नशीब म्हणून इमारतीबाहेर चौथ्या मजल्यावरून न पडता गच्चीत आत पडलीस. खरं सांग, त्या पाहुण्याने अंघोळ करणं हे इतकं महत्वाचं होतं की तू गेली १८ वर्षं fractured कण्याचं दु:ख झेलते आहेस?

Namesake माझं आवडतं पुस्तक आहे. त्यात गोगोल भारतीय आतिथ्य आणि पाश्चात्य hospitality चं मूल्यमापन करतो. खूप पदार्थ जेवायला बनवून दमायचं, (इज्जत का सवाल आहे ना! एवढं आम्ही जेवायला गेलो आणि त्यांनी २ चं पक्वान्न वाढली!!)  सगळ्यांची जेवणं झाल्यावर घरच्या मोठ्यांनी पाहुण्यांचं नोकर असल्यासारखं जेवायला बसायचं. versus host ने मोजकेच पदार्थ बनवायचे, पाहुण्यांनी पण एक पदार्थ आणायचा, आपण भेटतो आहोत ते दुसऱ्यांनी बनवलेलं चांगलं चुंगलं खायला नाही तर एकत्र भेटायला, हा basic underlying thought .

जन विषयांच्या किड्यांची धाव बाह्याकडेच असणार आहे, फूल देऊन, किंवा किती पक्वान्न बनवले त्यावरून जर आतिथ्याचे मोजमाप होणार असेल तर नाद सोड त्यांचा. तू काहीही केलंस तरी अशी लोकं काहीना काही खोट काढणारच. तेव्हा आतातरी स्वतःच्या वयाला, तब्येतीला जपायला हवं नाही का?

Postscript: As you write more and more personal, it becomes Universal. - Partner, व. पु. काळे 

Thursday, March 22, 2012

untitled

परवा कळलं, ECE मधल्या एका भारतीय मुलाला Sexual Offence साठी अटक झाली. एक sting operation होतं म्हणे, पोलिसांनी १३ वर्षीय मुलीचे guardian आहोत असं भासवून जाळं टाकलं आणि त्यात सुमारे २३ लोकं अडकली. या मुलाने म्हणे email केली होती, ज्यात त्याने विचारलं की मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे guardian ने या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. म्हणजे जाणून-बुजून त्याने अल्पवयीन मुलीसाठी!

त्याला नोकरी लागली म्हणून सगळी कागदपत्र मिळवण्याच्या खटपटीत कालपरवा पर्यंत ECE lab मध्ये रोज भेटायचा तो, गेल्या वर्षी एका विषयासाठी एकत्रच होतो वर्गात..  जबरदस्त धक्का असतो ओळखीच्या मुलाबद्दल असं काही कळलं की..
रूमीने  विचारलं- कसा होता तो; माझ्या मते  कसाही असला तरी २ महिन्यात ज्याला नोकरी लागणार आहे तो मुलगा असं काही नाही करू शकत. इथे नोकरी आधी background checking असतं, कोणता मुलगा स्वतःच्या career वर धोंडा मारून घेईल!

दुसऱ्या दिवशी कोणीही भारतीय भेटले की त्यांच्यात त्याचाच विषय निघत होता. सर्वांचं म्हणणं होतं की आता त्याला बराच काळ तुरुंगात काढावा लागेल, किंवा त्याला कदाचित deport करण्यात येईल. पण तरीही if proven guilty त्याचं career संपल्यातच जमा आहे. कसे काढणार तो तुरुंगात दिवस, तुरुंगात बाकी कैदी त्याचं छळ तर करणार नाहीत ना,  काय सांगणार तो त्याच्या आई-बाबांना की का अटक केली गेलीये त्याला! त्याला depression तर येणार नाही ना!  शेवटी रूमी म्हणाली की हा प्रसंग भारतात घडला असता तर आपण त्याला अक्षरशः वाळीत टाकलं असतं, इथे परदेशी घडला म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल, त्याच्या भंगलेल्या career बद्दल सहानुभूती वाटते आहे. तर आपण त्याला पाठीशी घालणं कितपत योग्य आहे!

मध्यंतरी आम्ही मित्र बोलत होतो, तेव्हा कपिलने मत मांडलं की Social Networking sites वर आपण काय काय वाचतो, कशाला पसंती नोंदवतो याची कुठेतरी नोंद होत असावी. (सगळ्या activity ची नाही, फक्त shady activity ची नोंद होत असावी.) त्या अनुषंगाने कोणी भलत्यासलत्या गोष्टींनी प्रभावित होत असेल तर त्याच्यावर बारकाईने e - नजर ठेवता येईल. शशांकने त्याला दुजोरा देत म्हणलं की लोकप्रिय sites वर लोक खरं नाव वापरतात, आणि एका इसमाला एकच account काढता येतो, तर यात नक्कीच काहीतरी तथ्य असावं. Dan Brown ने Digital Fortress मध्ये ही भीती बोलून दाखवली होती. या मुलाच्या संदर्भात मी रूमीला म्हणलं की background check मध्ये कदाचित ही माहिती काढणं शक्य असावं, आणि हे माहिती असताना तो मुलगा असं कसं करू शकतो?

कालपरवा पर्यंत साळसूद वाटणाऱ्याचं खरं रूप काही भलतंच असू शकतं! भय इथले संपत नाही version २ ..

Wednesday, March 21, 2012

Gator सहस्त्रनाम

एक वर्ष झालं की तुम्ही Freshers न राहता seniors असता. University त नव्याने येणारी मुले काय courses घेऊ, एखादा विषय कितपत time -intensive आहे  वगैरे विचारतात. अश्याच भेटीतून ओविया वगैरे तमिळ कंपू शी ओळख झाली. बोलता बोलता एक दिवस ओविया ने gator सहस्त्रनाम बद्दल सांगितलं, आणि पुढच्या शुक्रवारी येण्यास सांगितलं. सहज विचारलं, तुम्ही सगळे अय्यर असणार? Stereotypes पासून ४ हात लांब राहायचं म्हणलं तरी South Indian असून संस्कृत येतं म्हणजे अय्यरच असणार असा आराखडा ओळखीच्या बाकी तामिळी मित्रांवरून आपसूक बांधला गेला होता. KV मध्ये शिक्षण घेतलेल्या तामिळी मित्रांना फक्त संस्कृत नाही तर हिंदी सुद्धा समजतं. IT वाल्यांना भारतभर फिरताना आपल्याला किमान  हिंदीतरी यायला हवं ते  उमजतं, पण politicians ना हे कधी समजणार देव जाणे.

तिने बोलावल्यानंतर बऱ्याच अवधीने सहस्त्रनामास जायचा योग आला. सहस्त्रनाम, लक्ष्मी मातेची आरती आणि हनुमान चालीसा यांचे printouts  दिले गेले. श्लोक इंग्रजीत असल्यामुळे मला वाचायला त्रास होत होता पण बाकीची मुलं सहस्त्रनाम नित्यपाठ असावा अश्या शिताफीने पठन करत होते. बोली हिंदीत नसतानादेखील हनुमान चालीसा अर्थ उमजून आणि उत्तर भारतीय म्हणतात त्यापेक्षा वेगळ्या चालीत म्हणली गेली.

पठन झाल्यावर एका तरुणाने कृष्ण जन्माचे सांख्यिकी गुह्य सांगितले. कृष्ण जन्म मध्यरात्री झाला. देवांसाठी म्हणे एक मानव मास = एक दिवस असतो, तर शुक्लपक्ष म्हणजे देवांची सकाळ आणि कृष्णपक्ष म्हणजे देवांसाठी निशाकाळ.  तर कृष्णपक्ष अष्टमी म्हणजे देवांची मध्यरात्र होती. याही पुढे जाऊन त्याने सांगितले की कितीतरी वर्षांचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. तर पंचांगाप्रमाणे कृष्णजन्माब्द ब्रह्मदेवासाठी मध्यरात्र होती. तर संपूर्ण विश्वात मध्यरात्र असताना दीपिकेने मार्गदर्शन करण्यासाठीच जणू कृष्णाने जन्म घेतला.

काही दिवसांपूर्वी मी विचार व्यक्त केला की धर्माला जिवंत ठेवण्यात आपण कमी तर पडत नाही आहोत ना. आठवलं की माझ्या ओळखीतले दक्षिण भारतीय अजूनही रोज संध्यादि आराधना करतात. एका उत्तर भारतीय मैत्रिणीकडे लक्ष्मीपूजनास गेले असताना तिने खूपच सुंदर कथा सांगितली होती. माझ्या बंगाली मित्रांची नावं अनन्य आहेत. आपोआपच त्याने भाषेतील काही सुंदर शब्दांची जोपासना होत आहे. आता वाटतंय की फक्त महाराष्ट्रच तर मागे नाही ना पडत आहे?  पुणे, मुंबई, नागपूर च्या metropolitan झगमगीने  दिपून मराठी तर आपण विसरत आहोतच, धर्मापासून पण आपण फारकत घेतली आहे का? पिढ्यानुपिढ्या एका कुटुंबातून वारी निघते, आजकालची पोरं shortcut च्या नादात आणि आळसाचा गर्तेत  वारी तर विसरणार नाहीत ना? प्रश्न असणारच आहेत, उत्तर ज्याचं त्याने शोधायचंय, उत्तरच नव्हे तर solution शोधायचं. अब हमारे हवाले वतन, धर्म, भाषा साथियों..         

Tuesday, March 6, 2012

Thoughts since Marcy May

On a mission to watch Oscared or nearly oscared movies..
Martha Marcy May Marlene..कोणती स्त्री गुंगी उतरल्यावर बलात्कार resist करत नाही? त्याहीपेक्षा महत्त्वाचं..कोण बावळट बाई "I envy your 1st time" म्हणते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जाणून बुजून कोणती स्त्री दुसरीवर तोच प्रसंग ओढवावा म्हणून गुंगीचं औषध बनवते!  चित्रपट हा समाज मनाचा आणि इतिहासाचा आरसा असतो म्हणतात आणि खरोखरच या चित्रपटाचा antagonist Charles Manson नामक क्रूरकर्म्यावर बेतला आहे.
१९६८ च्या सुमारास हिप्पी जीवनपद्धतीने जन्म घेतला. समजापासून दूर रहायचं, Weed या गोंडस नावाखाली "चरायचं". Charles Manson ने अमली पदार्थ आणि स्वतःचा अंमल वापरून त्याच्या चेल्यांना इतरांचे खून करण्यास उद्युक्त केलं. कोणी कितीही सांगितलं तरी स्वतःची सारासार बुद्धी गहाण टाकून माणूस दुसऱ्याचा खून कसा करू शकतो?


हे वाचून मी अस्वस्थ असतानाच मित्र घरी आला. त्याने Milgram Experiment  बद्दल सांगितलं. मिल्ग्रम ने हा प्रयोग तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसावर केला होता, कोणा drug addict किंवा हिटलर ने brainwash केलेल्यावर नाही. तरी देखील.. कोणी ठासून सांगितलं की तुमच्या हिंस्त्र कृतीमुळे तुमच्यावर कोणतीही punitive action घेतली जाणार नाही, तर समोरच्या victim च्या किंकाळ्या ऐकू येत असूनही तुम्ही ते क्रौर्य पार पाडू शकता. मी म्हणले की फक्त किंकाळ्या ऐकण्यापेक्षा victim ला तडफडताना पाहिलं असतं तर कदाचित त्यांनी experiment थांबवली असती. मित्राचं म्हणणं होतं की मी  २ sensory  perceptions  मध्ये असा फरक कसा गृहीत धरते आहे?  Victim तडफडतो आहे हे दोन्ही वेळा कळलं असतं.  "पिंपात मेले ओले उंदीर" कवितेमुळे ऐकून होते की Gas chambers च्या peep hole मधून आत लोक कसे तडफडत आहेत हे बघितलं जात असे! तरीही ते अनन्वित हाल थांबण्यासाठी बघ्यांनी काहीच हालचाल केली नाही!

काही दिवसांपूर्वी वाचलेला लेख आठवला - चीन मध्ये St Bernard कुत्र्याचे मांस खातात म्हणून पाश्च्यात्य देशी हवालदिल झालेले. लेखकाने त्यांचा दांभिकपणा दाखवून दिला- कोंबडीचे मांस खाताना कुठे जाते त्यांची ही दया बुद्धी? ज्या प्राण्याला वर्षानुवर्ष पाळले त्या जातीच्या प्राण्याशी emotional  attachment निर्माण होऊन त्याला खाण्याचा विचार ही मनात येत नसावा.. म्हणून च कदाचित traditional हिंदू गाय खात नसावेत?
पण तीच vegetarian मी चपलेखाली तडफड जाणवत असतानाही झुरळ मारायला मागे पुढे बघत नाही.. एका अर्थाने मी देखील brainwashed च आहे ना की झुरळ हे त्रासदायक आहे आणि त्याला मारणे हेच इष्ट आहे?
त्याच क्षणी लख्ख आठवलं.. हिटलर नी ठासवलं होतं की ज्यू मनुष्य नसून कोणी त्रासदायक species आहे (संदर्भ: "ओले "उंदीर" "), आणि कदाचित त्या brainwashed लोकांनी  ज्यूंना मारायला मागे-पुढे पाहिले नाही.

कदाचित केवळ रक्तपात हेच आपल्यासाठी तडफडीचं द्योतक असावं? उंदीर मारण्यासाठी दयाळू पद्धत म्हणून Mortein  वापरतोच ना आपण?  Internal Haemorrhage होऊन तडफडून मृत्यू होत असला तरी बाहेर रक्त दिसत नाही म्हणून तर आपण त्याला Humane समजत नाही? क्रौर्याची परिसीमा गाठलेला प्रसंग म्हणजे Junko Furuta  चा अनन्वित छळाने मृत्यू. आजवर हे माझ्या समजुती पलीकडचे होते की तिची तडफड बघून देखील ती नाटक करतीये असं कसं वाटलं त्यांना? कदाचित आज मला त्याचं उत्तर कळलंय..

आजवर माझा ठाम विश्वास होता .. आहे.. की कोणताही माणूस सारख्या प्रमाणात चांगला/वाईट असतो..कोणीही उपजत क्रूर नसतो.. Charles Manson ने घडवलेले brainwashing , Milgram Experiment बद्दल वाचून माझं मलाच कळत नाहीये की असा so-called humanity वर विश्वास ठेवणं अंधविश्वास तर नाहीये ना?   

Monday, January 30, 2012

ISKCON

वाढदिवसाच्या सुमारास तरी निदान देवदर्शन करावं असा हेतू / मन्नत. इथलं एकुलतं एक मंदिर  म्हणजे ISKCON मंदिर घरापासून २२ मैल दूर. गेल्या वर्षी जायचं ठरलं तेव्हा College senior ने सांगितलं की University जवळच्या कृष्ण house मार्फत मंदिरात घेऊन जायची व्यवस्था आहे. या वर्षी सुद्धा मी कृष्ण house च्या Ride Co-ordinator  शी संपर्क साधला. तर त्याने मला दुपारी ३.३० ला पोहोचायला सांगितलं.  तेव्हा २.३० वाजले असतील, मी बाहेर होते, दुपारचं जेवण देखील झालं नव्हतं. इथे बस रविवारी दर तासाला असते. म्हणजे पुढची बस ३.३० ला निघून मी ४ ला कृष्ण house ला पोहोचले असते. मी त्याला माझ्यासाठी थांबायला सांगितलं. तो बोलला की इतरांना थांबायला सांगणं काही जमणार नाही त्यामुळे मी पुढच्या रविवारी यावं. 

अजून तरी कोणी मन्नत postpone केल्याचं ऐकिवात नाही. मी माझ्या मित्रांना सायकल मागितली. दोघांची सायकल चोरीला गेलेली. एका मित्राची सायकल माझ्या घराखालीच लावलेली. एक महिना तिला कोणी पाय पण न लावलेला. बाकी लोकांकडे सायकल नाही म्हणून मी सहज बघते तो काय! त्या सायकल मध्ये बऱ्यापैकी हवा होती. मग मित्राकडे किल्ली मागितली आणि खाश्या स्वाऱ्या सायकल वरून निघाल्या. अर्ध्या वाटेला पोहोचेपर्यंत ३.३० होत आले होते. 

college मध्ये असताना प्रोफेसर आमच्याशी तुसडेपणानी वागायचे. जणू काही त्यांच्या गावीच नव्हतं की college विद्यार्थ्यांमुळे चालतं,  प्रोफेसरांमुळे नाही. ज्या मुलांसाठी college बनवलंय ती मुलंच college च्या वाईट publicity मुळे college मध्ये दाखल झाली नाही तर ना college राहील ना प्रोफेसरांची नोकरी. इथे पण मला तोच attitude दिसला. ज्या भक्तांसाठी गाडी ठरवायची त्या भक्तांनाच येऊ नका म्हणलं तर कसं! मनात म्हणलं की गाडी त पोहोचल्यावर बाकी लोकांना विचारलं पाहिजे की खरच त्यांना ५ मिनिट थांबायला काही त्रास होता का. आणि खरच इतकी भक्ती असेल की ५ मिनिट देखील थांबवत नसेल तर अश्या भक्तांना इतरांच्या भक्तीचा आदर पण असायला हवा. 

एव्हाना मी बरीच दमले होते. एकतर सायकल मध्ये त्यामानाने हवा कमी होती. वरून त्याची chain अलगद ना फिरता अडकून अडकून आचके देऊन फिरत होती. ही कोणती प्रेरणा आहे की मी आज सायकल चालवते आहे? कोणत्या प्रेरणेने मला ही सायकल बघावीशी वाटली! बस उपलब्ध असताना मला श्रम करत जावंसं वाटतंय असं काय खास आहे त्या देवळात? कोणत्या अन्तः प्रेरणेने दर वर्षी वारकरी शेकडो मैल चालत जातात. मनात अनेक प्रश्न. मी सुमारे ३.३६ ला तिथे पोहोचले आणि आम्ही निघालो. 

ISKCON च्या ख्याती प्रमाणे अतिशय जोरात चाललेल्या भजनावर लोक नाचायला लागले. उद्वेगाने कानावर हात ठेवले, पुन्हा मनात आलं, की भारतात होत नाहीत का जोर-जोरात कीर्तनं? की वारीत लोक रिंगण वगैरे करताना नाचत नाहीत? मग इथे येऊनच मी मनाची कवाडं उघडी ना ठेवता का Conclusions काढते आहे. तासाभराने Open  House सुरु झालं. यंदा भारतीय वक्ता होता, श्रोते सुद्धा active participants होते. श्रोत्यांकडून प्रभुपादांच्या कथांचा उल्लेख चर्चेच्या अनुषंगाने आला. मी नव्याने आले म्हणून मला भगवद्गीतेची एक प्रत देण्यात आली. मग प्रसाद आणि मग परतीचा प्रवास.

प्रवासात देखील संवाद रंगला होता. आमच्या अमेरिकन माताजींच्या मते गीता As it is समजून घेतली पाहिजे == प्रभूपादांच version तेच सर्वोत्तम. जसं की माताजींनी म्हणलं की "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" चा अर्थ काही लोक शरीर असं लावतात, आणि गीता ही एक allegory मानतात.  माझ्या मते संस्कृत मध्ये एकाच शब्दांचे अनेक अर्थ असतात. प्रत्येकाला जो अर्थ कळतो/ भावतो त्याप्रमाणे तो त्याचा अर्थ लावतो. त्यामुळे आपण जितके वेगवेगळे versions वाचू तितकं चांगलं.  काही दिवसांपूर्वी इथे Community सत्यनारायण पूजा झाली होती. तेव्हा पुजाऱ्याने "स्नेह" या शब्दाचे अर्थ सांगितले. देवाला तूप वहायचं या पेक्षा देवाला प्रेम अर्पण करायचं हे मला जास्त पटलं होतं. तसंच आत्ताही  मला हा शरीर allegory वाला अर्थ खूपच मार्मिक आणि योग्य वाटला. 

रात्री घरी आल्यावर गीता वाचण्यास उघडली. आठवलं की माझी क्रिस्ती roommate रोज पानभर तरी बायबल वाचल्याशिवाय झोपायची नाही. किंवा सकाळी ५ ला च उठून meditate करताना बायबल वाचायची. मग हिंदू धर्मात कोणी तरुण असा गीता पाठ का करत नाही? Out  of  fashion  / outdated वाटतं म्हणून ? धर्मासाठी positive support group निर्माण करायला हिंदू धर्म का मागे पडलाय?
Charity begins at home. सुरुवात स्वतःपासून करायची ठरवलीये. वाढदिवसासाठी नवे resolution .. संस्कृत चं थोडाफार ज्ञान आहेच.. गीता मला जशी कळली, पटली तशी.. 

Friday, January 20, 2012

भय इथले संपत नाही

New Year च्या सुमारासच university मधली एक भारतीय मुलगी cardiac arrest ने गेली.. तिचा FB page नव-वर्षाभिनंदनाऐवजी RIP नी भरला होता. इथे बसून काय झालं असेल त्याचा आम्ही फक्त तर्कच लावू शकत होतो. काल बाकी लोक परतले, त्यांच्याकडून कळलं. भारताला विमानातून जाताना त्या मुलीला Deep Vein Thrombosis झाला. २ दिवस वेदना सहन केल्यावर ती डॉक्टरकडे गेली, पण तोवर ती गाठ हृदयापर्यंत पोहोचली. Shock ! कोणी असं तडकाफडकी कसं जाऊ शकतं... 

आमच्या सोबत आलेले बरेच लोक सुट्टी साठी भारतात गेलेले, घरटी एक एक जण असावा.  भारतात आजूबाजूला हजार लोक असायची इतकी सवय झालेली.. इथे अचानक सगळं भकास आणि घाबरवून सोडणारं.. वरून Wiki आहेच इथे घडलेल्या कृष्णकृत्यांची माहिती द्यायला..

सुट्टीसाठी एका मैत्रिणीकडे तिची बहीण आलीये. अंडी उकडताना चुकून microwave चं दार उघडलं आणि काही कळायच्या आत उकळते पाणी चेहऱ्यावर उडून 2nd degree burns . थोड्याच दिवसांसाठी येणार म्हणून Insurance पण नाही.. 

College सुरु झालं तसं नव्या batch ची मुलं परतली. असेच आम्ही गप्पा मारत असताना एक जण म्हणाला की एका माथेफिरूमुळे बेत अर्ध्यावर रद्द करून त्याला Mt Raimier वरून परतावं लागलं. त्या माथेफिरूने तिथे पोलिसांवरच गोळीबार केला. तो सांगत होता की पोलिसांनी सगळ्या campers ना armoured cars ने परत आणलं.   

भारतातून batchmates परतल्यावर एक get -together होते. जाता-जाता एका घरी डोकावलो तर तिथे मित्र त्याचा camera शोधत होता. त्यांचा wireless router पण गायब! सगळ्यांचच सामान unpacking  मुळे अस्ताव्यस्त पसरलेलं, तरीही  जाणून  बुजून उचकटलं आहे ते लक्षात आलं. खिडकीची जाळी काढून घरात घुसून हात साफ केला गेला होता तर.. 

सगळंच अनपेक्षित.. छोटे बडे शहरोंमें छोटी मोटी वारदातें होती रहती हैं.. सरता संपत नाही.. 


Tuesday, January 17, 2012

India Diary: मनःचक्षु

As my roomies return from their month long stay in India, thoughts and memories rush to me. This is how my India trip would have been if I had gone home with my roomies..
Home  coming  च्या बऱ्याच गोष्टी ऐकून आहे. स्वामी विवेकानंदांनी येताक्षणी भारतीय मातीला घातलेला दंडवत ते  इथल्या  lifestyle  ला सारवलेल्यानी  मुंबई विमानतळावर विमान land होताच धारावीच्या वासानी मुरडलेलं नाक at the opposite end of the spectrum!  ज्या भूमीनी  इतकी वर्ष पोसलं त्याचा कण अन कण, स्पर्ष अन स्पर्ष मला हवासा आहे.  इथे येताना, नव्या आयुष्याची सुरुवात करताना एक कण रडायचं नाही बजावलं होतं.. आता आई बाबांना बघून बांध घालणं " मुश्किल हि नहीं नामुमकिन" आहे.

घरी पोचल्यावर आई पायांवर दूध आणि पाणी घालेल, मग पाय ओला  असतानाच त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढेल. आजी दारातच दृष्ट काढून मगच घरात घेईल. Roomy च्या घराला नवा रंग दिलाय कळलं तेव्हाच मी आईला विचारलं की आपल्या घरी काय काय बदल झालाय. दीड वर्षांनी स्वतःचं  घर बघणं हा पण एक सोहळाच आहे. एकदा स्वप्नात Dallas चं घर आलं होतं, Dallas सोडून ३-४ महिने झाल्यावर. स्वप्नात सुद्धा घर अगदी जसं होतं तसंच दिसलं. ज्या घरात मी १२ वर्ष राहिलीये ते घर मी कसं विसरीन मग? भिंतीच्या रंगासकट  सगळं मी जाताना जसं होतं तसं अलवार मिटलेल्या डोळ्यांनी दिसतं...Hall मधले माझे sketches , माझा पलंग, त्यावरची geometric print ची गुलाबी बेडशीट, माझा संगणक , बाल्कनीच्या grill वर बसायची माझी हक्काची जागा..मधूनच आत येणारी चिमणी..

येतीलंच  आता माझ्या roomies , पण मी आधीच जाऊन मनानी एक फेरफटका मारून आले.. Faster than light :)


Monday, November 14, 2011

तू Vs मी

All characters in the चारोळ्या are highly fictional.. any resemblance to any person living or dead is highly coincidental.. :)
but the human nature and the relationship dynamics reflected in the lines.. you come across it @ every nook and corner..

(1)
मी पत्त्यांचा बंगला बांधायचा
तू  फुंकर मारून वावटळ पाठवणार 
मी स्वप्नांचे मनोरे बांधायचे 
तू पायाखालून जमीन खेचणार 
एकदा तरी माझा खेळ मलाच उधळू दे ना..
--दीपिका रानडे

(2)
मला स्वप्न रंगवायला आवडायची ..
तुझं भविष्य-रंजनाशी  वाकड आहे ..
मी स्वप्न पहायची बंद केली ..
तुला त्याचाही त्रास आहे
स्वतःला तुझ्या इच्छेने चालवताना ..
मी थकले आहे ..
तुझी गती कमी होते आहे
तुला त्याचच दु:ख आहे ..
--दीपिका

(3)
मला तुझ्याशी वाद घालायला आवडतं
माझ्यासाठी तो ही एक संवादच असतो
तुझ्यासाठी मात्र..
"तू आणि मी" कधीच संपून
"तू versus मी" सुरु झालं असतं
--दीपिका

Saturday, August 6, 2011

विरासत

मनात बऱ्याच विचारांचा काहूर .. म्हणलं  श्रीकांत आणि शशांक ला जमतंय तर मी पण इथे देवनागरीत लिहून पहावं.. शेवटी मातृभाषेतच आपण स्वतःला मनसोक्त व्यक्त करू शकतो..

तर सुरुवात अशी झाली..पुण्यात असताना 'सकाळ'चं पारायण केल्याशिवाय दिवस पुरा व्हायचा नाही, इथे येऊन फरक इतकाच पडला की सकाळ सोबत ४ गोष्टी अजून वाचल्या जाऊ लागल्या. असंच वाचताना हे गवसले..

हे हिंदु शक्तिमध्ये निर्माण झालेल्या, अंधाराचा नाश करणाऱ्या प्रखर तेजा,
हे हिंदूंनी केलेल्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्वरी सामर्थ्या,
हे हिंदूंचे वैभव असणाऱ्या, सौभाग्य असणाऱ्या आणि कल्याणकारी अलंकारा,
हे हिंदूंमध्ये निपजलेल्या, दुष्टांचा कर्दनकाळ असलेल्या नरसिंहा, प्रभो शिवाजी राजा
हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करते.
अंतःकरणातील उचंबळून आलेल्या भावना तुझे अभिनंदन (गुणगान ) करतात.
मी तुझ्या पायाशी माझे भक्तिरूपी चंदन अर्पण करतो.
ज्या तुला उघडपणे सांगू शकत नाही अशा माझ्या मनातील इच्छा ( 'माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करावेस' हीच ती इच्छा असणार) तू पूर्ण कर.

हे फार संस्कृत-प्रचुर असल्या कारणानी म्हणे अर्थ समजायला अवघड आहे. मला तर असं वाटलं नाही बुवा.. कदाचित ५ वर्ष संस्कृत शिकल्यामुळे असावं..पण नुसतं शिकण्यापेक्षा त्यातली २ वर्ष मी संस्कृत जगले आहे. मराठी आणि एकंदरच भाषांची आवड आई-आजी कडून वारसाहक्कानी मिळालेली, 'चिंटू' मुळे कोणी न शिकवताच स्वतःहून मराठी वाचता यायला लागलेलं..दादाला मुंजीत मिळालेली एकजात सगळी पुस्तकं त्याच्या आधी मीच वाचलेली. शाळेत संस्कृत आणि german मधून काय निवडावं हा प्रश्न त्याच्यामुळे कधी उद्भवलाच नाही. संस्कृत च्या वर्गात जीवष्य कंठस्य मानसी भेटली.  व्याकरणाचा पाया शाळेत रोवला गेला..पण ferguson नी अक्षरशः भाषेच्या विश्वात फिरायला शिकवलं. Ferguson नी cross reference नी गोष्टी गुंफून etymology चा विचार करायची दृष्टी दिली.

वरील पोवाड्यातील संभूत शब्दाचा अर्थ मी विसरलेले, पण पाया तर आहेच ना..
सम + भव असं verb root , त्याचं तद्धित रूप, पुढे mr . cross reference मदतीला आले - "संभवामि युगे युगे". संभव चा  "जन्म घेणे" असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. अश्या प्रकारे संभूत या शब्दाचा अर्थ गवसला आणि ही साठा उत्तराची कहाणी सफलपणे पार पडली.  

पण एवढ्यावरच विचारांची चक्रे थोडी थांबतात. एका मित्राचं उत्तर आलं, की त्याला पण अर्थ माहित नव्हता. हा मित्र पु. लं. या विषयावर अखंड भाष्य करू शकतो म्हणजे त्याचं वाचन (हल्लीच्या पिढीच्या मानाने) दांडगं असावं. असं असताना यालाही अर्थ नये कळू! कुठेतरी आपण आपला ठेवा पुढच्या पिढी पर्यंत पोचवायला कमी पडतोय की काय! ( पक्की पुणेरी असल्याने पु लं च्या "पुणेकर" प्रमाणे मी देखील "आमच्या वेळी हे असं नव्हतं" type dialogues मारते :) ) आजीची आठवण आली..कितीतरी कविता, श्लोक येतात तिला. लहानपणी हे सगळं दिवेलागणीला म्हणलं जायचं आणि मलाही त्यातलं बरंचसं यायचं.. मग हे सगळं मी आता का विसरले आहे? "मोडी लिपी नावाचं मराठीशी संबंधित काहीतरी होतं" एवढंच का मागे उरलं आहे? 'आठवणीतल्या कविता' सगळ्यांच्याच विस्मरणात का गेल्या आहेत? 

वेळ नाही हे standard कारण..
खरं उत्तर घरात सगळ्यांनाच माहित आहे..  पण चार चौघात बोलायची चोरी! 
जो माणूस जाहीर मत व्यक्त करतोय तो  politician आहे म्हणून त्याच्या म्हणण्याला publicity stunt समजून हाणून पडायचा पराक्रम आपणच करतोय ना? नाटक/सिनेमात सगळ्यांना समजेल अशी भाषा पाहिजे म्हणत म्हणत आपण hinglish ला किती सहज अंगी भिनवलय.. "लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी" चं मी अनुभवलेलं सत्य " आपुल्या घरात हाल सोसते मराठी" हे आहे!

Dallas ला museums मध्ये भारतीय शिल्पकलेचे नमुने पहिले. त्यातले काही तर 4 th century B .C   चे! काय असावी त्यांची बाजारातली किंमत! मला dollar किती सामर्थ्यशील आहे याच्याशी काही घेणं देणं नाहीये, ती  शिल्प विकत घ्यायची ऐपत कोणा एकट्याची  नसणारे एवढं कळण्याइतपत अर्थशास्त्र मी पण शिकलीये. थोडक्या पैश्यासाठी भारतीयच संस्कृती विकत आहेत. बव्हंशी हे उद्योग चालवणार्यांना निवडून देण्याचं परम पुण्य आपणच केलंय ना?

ऐकून आहे की अनेक भाषा मृत झाल्या कारण त्या बदलत्या काळाप्रमाणे प्रवाही राहिल्या नाहीत. आपण सगळी भेसळ करून फक्त जिवंत आहे दाखवण्यापुरता सांगाडाच मागे नाही ना ठेवणार आहोत?

एक काळ होता जेव्हा मी etymology ला career म्हणून निवडण्याच्या तयारीत होते. पण ती चाकोरी .... साचेबद्ध आयुष्याची security .. ते खुणावणारं अभियांत्रिकी career , ते intriguing electronic circuits .. ते वळण पुढे परत भेटणार असं intuition आहे, पण तोवर त्या लोकांनी (चार चौघात त्यांचं नाव घेण्याइतकी हिम्मत माझ्यात नाहीये) सरस्वतीला जाळून टाकलं नसलं म्हणजे मिळवली.