एक वर्ष झालं की तुम्ही Freshers न राहता seniors असता. University त नव्याने येणारी मुले काय courses घेऊ, एखादा विषय कितपत time -intensive आहे वगैरे विचारतात. अश्याच भेटीतून ओविया वगैरे तमिळ कंपू शी ओळख झाली. बोलता बोलता एक दिवस ओविया ने gator सहस्त्रनाम बद्दल सांगितलं, आणि पुढच्या शुक्रवारी येण्यास सांगितलं. सहज विचारलं, तुम्ही सगळे अय्यर असणार? Stereotypes पासून ४ हात लांब राहायचं म्हणलं तरी South Indian असून संस्कृत येतं म्हणजे अय्यरच असणार असा आराखडा ओळखीच्या बाकी तामिळी मित्रांवरून आपसूक बांधला गेला होता. KV मध्ये शिक्षण घेतलेल्या तामिळी मित्रांना फक्त संस्कृत नाही तर हिंदी सुद्धा समजतं. IT वाल्यांना भारतभर फिरताना आपल्याला किमान हिंदीतरी यायला हवं ते उमजतं, पण politicians ना हे कधी समजणार देव जाणे.
तिने बोलावल्यानंतर बऱ्याच अवधीने सहस्त्रनामास जायचा योग आला. सहस्त्रनाम, लक्ष्मी मातेची आरती आणि हनुमान चालीसा यांचे printouts दिले गेले. श्लोक इंग्रजीत असल्यामुळे मला वाचायला त्रास होत होता पण बाकीची मुलं सहस्त्रनाम नित्यपाठ असावा अश्या शिताफीने पठन करत होते. बोली हिंदीत नसतानादेखील हनुमान चालीसा अर्थ उमजून आणि उत्तर भारतीय म्हणतात त्यापेक्षा वेगळ्या चालीत म्हणली गेली.
पठन झाल्यावर एका तरुणाने कृष्ण जन्माचे सांख्यिकी गुह्य सांगितले. कृष्ण जन्म मध्यरात्री झाला. देवांसाठी म्हणे एक मानव मास = एक दिवस असतो, तर शुक्लपक्ष म्हणजे देवांची सकाळ आणि कृष्णपक्ष म्हणजे देवांसाठी निशाकाळ. तर कृष्णपक्ष अष्टमी म्हणजे देवांची मध्यरात्र होती. याही पुढे जाऊन त्याने सांगितले की कितीतरी वर्षांचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. तर पंचांगाप्रमाणे कृष्णजन्माब्द ब्रह्मदेवासाठी मध्यरात्र होती. तर संपूर्ण विश्वात मध्यरात्र असताना दीपिकेने मार्गदर्शन करण्यासाठीच जणू कृष्णाने जन्म घेतला.
काही दिवसांपूर्वी मी विचार व्यक्त केला की धर्माला जिवंत ठेवण्यात आपण कमी तर पडत नाही आहोत ना. आठवलं की माझ्या ओळखीतले दक्षिण भारतीय अजूनही रोज संध्यादि आराधना करतात. एका उत्तर भारतीय मैत्रिणीकडे लक्ष्मीपूजनास गेले असताना तिने खूपच सुंदर कथा सांगितली होती. माझ्या बंगाली मित्रांची नावं अनन्य आहेत. आपोआपच त्याने भाषेतील काही सुंदर शब्दांची जोपासना होत आहे. आता वाटतंय की फक्त महाराष्ट्रच तर मागे नाही ना पडत आहे? पुणे, मुंबई, नागपूर च्या metropolitan झगमगीने दिपून मराठी तर आपण विसरत आहोतच, धर्मापासून पण आपण फारकत घेतली आहे का? पिढ्यानुपिढ्या एका कुटुंबातून वारी निघते, आजकालची पोरं shortcut च्या नादात आणि आळसाचा गर्तेत वारी तर विसरणार नाहीत ना? प्रश्न असणारच आहेत, उत्तर ज्याचं त्याने शोधायचंय, उत्तरच नव्हे तर solution शोधायचं. अब हमारे हवाले वतन, धर्म, भाषा साथियों..

1. http://www.hindudevotionalblog.com/2008/12/vishnu-sahasranamam-stotram-lyrics-1000.html
ReplyDelete2. http://www.hindudevotionalblog.com/2008/10/lakshmi-ashtottara-shatanamavali.html
3. http://www.hindilyrics.net/lyrics/of-Hanuman%20Chalisa.html